इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या खेळण्यासंदर्भात नवे ट्विस्ट समोर आले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन नील टेन डोशेट यांनी बर्मिंघमच्या एजबेस्टनच्या मैदानात रंगणाऱ्या कसोटी सामन्यासाठी बुमराह सिलेक्शनसाठी उपलब्ध असेल, असे म्हटले आहे. एका बाजूला बुमराहच्या जागी कोण खेळणार ही चर्चा रंगत असताना भारतीय सहाय्यक कोचनं बुमराह नावाचं 'ब्रह्मास्त्र' कधी अन् कसं वापरण्यात येईल? टीम इंडियाचा त्याला खेळवण्याचा प्लॅन काय आहे? यासंदर्भातील माहिती दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काय म्हणाले असिस्टंट कोच?
टेन डोशेट म्हणाले की, "तो निवडीसाठी उपलब्ध असेल. इंग्लड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांपैकी तो फक्त ३ सामन्यात खेळणार हे आधीच ठरलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर रिकव्हरीसाठी त्याला आठ दिवसा मिळाले आहेत. उर्वरित चार सामन्यासाठी सर्वोत्तम रणनितीसह उतरण्याचा प्लॅन आखला असून जर गरज वाटली तर शेवटच्या क्षणी बुमराहला दुसऱ्या सामन्यात खेळवण्याचा पर्यया खुला असेल, असे सहाय्यक प्रशिक्षकाने म्हटले आहे.
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
त्याला खेळवण्यासंदर्भात या गोष्टींचाही केला जातोय विचार
बुमराह फिट असून तो खेळण्यासाठी तयार आहे. फक्त त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याचा निर्णय हा खेळपट्टी पाहून घेतला जाईल. लॉर्ड्स आणि मँचेस्टरच्या मैदानातील सामन्यासाठी त्याचा वापर अधिक प्रभावी ठरेल का? या मैदानातील सामन्यासाठी त्याला राखून ठेवायचं का? या गोष्टींचाही टीम मॅनेजमेंट विचार करत आहे, ही गोष्टही सहाय्यक प्रशिक्,काने बोलून दाखवली आहे.
जसप्रीत बुमराहला खुणावतोय मोठा विक्रम
जसप्रीत बुमराह एजबेस्टन कसोटी सामन्यात मैदानात उतरला आणि त्याने आणखी एक पंजा मारला तर SENA देशांत सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणारा आशयाई गोलंदाज होण्याची संधी त्याच्याकडे असेल. आतापर्यंत त्याने १० वेळा अशी कामगिरी करून दाखवली आहे. लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात जसप्रीत बुमराहनं पाच विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रम याच्या नावे ११ वेळा अशी कामगिरी करण्याचा रेकॉर्ड आहे. बुमराह त्याच्या या रेकॉर्डचा अगदी वेगाने पाठलाग करताना दिसतोय.