England vs India 1st Test लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल या जोडीनं भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. सलामी जोडी शतकी भागीदारीच्या उंबरठ्यावर असताना असताना ब्रायडन कार्स याने लोकेश राहुलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का दिला. ७४ चेंडूत ८ चौकाराच्या मदतीने ४२ धावा करून तो तंबूत परतला. पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडचे खांदे पडले असताना बाहेर जाणाऱ्या चेंडूवर तो फसला अन् इंग्लंडच्या संघाला मोठा दिलासा मिळाला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या आणि पदार्पणाचा कसोटी सामना खेळणाऱ्या साई सुदर्शन याला बेन स्टोक्स याने शून्यावर माघारी धाडले. परिणामी पहिल्या सेशनमध्ये भारतीय संघाने ९२ धावांवर दोन विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियानं दोन विकेट्स गमावल्या, पण...
नाणेफेक गमावल्यावर उपहारापर्यंत भारतीय संघाने एकही विकेट गमावली नसती तर इंग्लंडचा संघ आणखी बॅकफूटवर गेला असता. पण केएल राहुल पाठोपाठ साई सुदर्शनच्या रुपात टीम इंडियाने लंच ब्रेकआधी दोन विकेट्स गमावल्या. इंग्लंडला यामुळे निश्चितच मोठा दिलासा मिळाला. पण त्याआधी यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचत खास विक्रम सेट केल्याचे पाहायला मिळाले.
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
केएल राहुल-यशस्वी जैस्वाल ही ११ वर्षांतील सुपर हिट जोडी
यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल जोडीनं पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची दमदार भागीदारी रचली. २०१४ पासून लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात कोणत्याही संघातील सलामी जोडीनं केलेली ही सर्वोत्तम भागीदारी आहे. याआधी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियनं संघाने २०२३ मध्ये पहिल्या सेशनमध्ये या मैदानात ४ विकेट्स गमावून ९१ धावा केल्या होत्या. याशिवाय श्रीलंकेच्या संघाने २०१४ मध्ये पहिल्या सेशनमध्ये २ विकेट्सच्या मोबदल्यात ७४ धावा केल्या होत्या. यशस्वी-केएल राहुलच्या आश्वासक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने हेडिंग्लेच्या मैदानात ११ वर्षांतील सर्वोत्तम सुरुवात करून दिली. ही गोष्ट टीम इंडियासाठी जमेची बाजू आहे.