भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने या सामन्यात दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्यांदा फलंदाजी करताना धावफलकावर ५८७ धावांचा डोंगर उभारल्यावर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्या डावात धक्क्यावर धक्के दिले. आकाश दीप आणि सिराजनं इंग्लंडची अवस्था बिकट केली. दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या संघाने अवघ्या ७७ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. खेळ संपता संपता प्रसिद्ध कृष्णानं टीम इंडियाला जवळपास चौथी विकेट मिळवून दिली होती. पण हॅरी ब्रूकनं "प्रेझेंस ऑफ माइंड"चा नजराणा पेश करत क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलचा डाव खेळला अन् आपली विकेट वाचवली. यावर रिषभ पंतनंही रिअॅक्शन दिल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शेवटच्या षटकात ड्रामा, पंतनं अंपायरकडे केली ब्रूक टाइमपास करतोय अशी तक्रार
Rishabh Pant VS Harry Brooks
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच धक्क्यावर धक्के देत बिकट अवस्था केल्यावर इंग्लंडच्या बॅटर्संना दुसऱ्या दिवसाचा खेळ कधी थांबतोय याची घाई झाली होती. तीन विकेट्स गमावल्यावर दिवसाअखेर आणखी एक विकेट पडू नये, अशी भिती इंग्लंडच्या बॅटर्संना जाणवत होती. इंग्लंडच्या पहिल्या डावातील १९ व्या षटकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर ब्रूक वारंवार ग्लोव्ज काढून टाइम पास करताना दिसले. पंतनं त्याची तक्रार केली अन् त्याचा डाव फसला. इंग्लंडला आणखी एक षटक खेळावे लागले.
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर ब्रूकची विकेट वाचवण्यासाठी 'कसरत'
प्रसिद्ध कृष्णा घेऊन आलेल्या २० व्या आणि दुसऱ्या दिवसातील अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर ब्रूक आउट होता होता वाचला. या षटकातील पाचव्या चेंडूवर ब्रूकच्या बॅटची कड घेऊन चेंडू हवेत उडाला. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवून असलेल्या ब्रूकच्या चेंडू स्टंपवर पडतोय हे लक्षात आले. मग त्याने खांद्याने चेंडू स्टंपपासून बाजूला उडवला. ही कसरत करताना त्याचा पाय स्टंपला लागता लागता वाचला. फुटबॉलमध्ये डिफेंडर हात न लावता चेंडू खांद्याने टोलवतो त्या तोऱ्यात ब्रूक आपली विकेट वाचवण्यात यशस्वी ठरला. त्याच्या या कसरतीला विकेटमागून रिषभ पंतनंही दाद दिल्याचे पाहायला मिळाले. "गूड प्रेझेंस ऑफ माइंड" असं म्हणत भारतीय विकेट किपरनं प्रतिस्पर्धी संघातील गड्याचे कौतुक केले. सोशल मीडियावर ब्रूकच्या कसरतीचा किस्सा चर्चेचा विषय ठरत आहे.
Web Title: ENG vs IND 2nd Test Day 2 Harry Brook’s Shouldering The Ball Away From His Stumps To Defend His Wicket Better Than Most English Football Defenders Rishabh Pant Reaction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.