Join us

ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

जेमी स्मिथ-हॅरी ब्रूकनं पाडले भारतीय गोलंदाजांचे खांदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 18:29 IST

Open in App

बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात शुक्रवारी तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने दमदार सुरुवात करत इंग्लंडच्या संघाची अवस्था ५ बाद ८४ धावा अशी केली. संघ अडचणीत असताचा इंग्लंडचा विकेट किपर बॅटर जेमी स्मिथ विक्रमी शतकी खेळी साकारली. अर्धा संघ तंबूत परतल्यावर बझबॉल रणनिती फॉलो करत या पठ्ठ्यानं ८० चेंडूत शतक साजरे करत केले. इंग्लंडच्या संघाकडून त्याने कसोटीत तिसऱ्या जलद शतकाची नोंद केली. एवढेच नाही तर या शतकी खेळीसह १४८ वर्षांत जे कुणाला जमलं नाही तो पराक्रम त्याने करून दाखवलाय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

१४८ वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

जेमी स्मिथनं ८० चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. १८७७ मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर जेमी स्मिथ हा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला ज्याने लंचपूर्वी एका सत्रात १०० पेक्षा अधिक धावा केल्या. लंच आधी हॅरी ब्रूकसह त्याने १६५ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.

IND vs ENG : हॅरी ब्रूकच्या 'त्या' कृतीवर पंत, गिल भडकले, पंचांकडे केली तक्रार; नेमकं काय घडलं?

जेमी स्मिथ-हॅरी ब्रूकनं पाडले भारतीय गोलंदाजांचे खांदे

जो रूट आणि हॅरी ब्रूक या जोडीनं ३ बाद ७७ धावांवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. इंग्लंडच्या धावफलकावर ८४ धावा असताना मोहम्मद सिराजनं जो रुटच्या रुपात इंग्लंडच्या संघाला चौथा धक्का दिला. त्याची जागा घेण्यासाठी आलेला बेन स्टोक्सही शून्यावर माघारी फिरला. संघ अडचणीत असताना जेमी स्मिथनं आक्रमक अंदाजात फलंदाजी करत लंच आधी शतक साजरे केले. दुसऱ्या बाजूला हॅरी ब्रूक शतकाच्या उंबरठ्यावर पोहचला. दोघांनी मजबूत भागीदारी रचत भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडत उपहारापूर्वी इंग्लंडच्या धावफलकावर ५ बाद २४९ धावा लावल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंड