ENG vs IND 1st Test Jasprit Bumrah Record : इंग्लंड विरुद्धच्या हेडिंग्ले कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात पहिल्याच षटकात इंग्लंडची सलामी जोडी फोडणाऱ्या जसप्रीत बुमराहनेच टीम इंडियाला दुसरी विकेटही मिळवून दिली. झॅक क्रॉउलीच्या विकेटनंतर बेन डकेट याला त्याने अर्धशतकी खेळीनंतर तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या स्पेलमध्ये त्याने इंग्लंडच्या या बॅटरलाही फसवले होते. पण गचाळ क्षेत्ररक्षणामुळे बुमराहची दुसऱ्या विकेटची प्रतिक्षा लांबली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सेट झालेली जोडी फोडत बुमराहनं रचला नवा इतिहास
इंग्लंडच्या डावातील २८ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमरानं ६२ धावांवर डकेटला बोल्ड केले. त्याने ओली पोपच्या साथीनं शतकी भागीदारी रचली. सेट झालेली ही जोडी फोडत बुमराहाने टीम इंडियाला दिलासा तर दिलाच. पण या विकेटसह मोठा विक्रमही त्याने आपल्या नावे केला आहे. जसप्रीत बुमराह हा SENA देशांत म्हणजे (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा आशियन गोलंदाज ठरला आहे. त्याने पाकच्या दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम याला मागे टाकले.
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
जसप्रीत बुमराह नंबर वन! पाकच्या स्विंग अन् यॉर्कर किंग वसीम अक्रमचा विक्रम मोडला
पाकिस्तानच्या स्विंग अन् यॉर्करचा किंगला मागे टाकत जसप्रीत बुमराह आता SENA देशांत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आशियाई गोलंदाज ठरला आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दुसरी विकेट घेताच बुमराहच्या खात्यात १४७ विकेट्स* जमा झाल्या. या यादीत वसीम अक्रम १४६ विकेट्ससह दुसऱ्या तर भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे १४१ विकेट्स सह तिसऱ्या स्थानावर आहे.
- जसप्रीत बुमराह (भारत) १४७
- वसीम अकरम (पाकिस्तान) १४६
- अनिल कुंबले (भारत) १४१
- इशांत शर्मा (भारत) १३०
- मुथैया मुरलीधरन (श्रीलंका) १२५
- मोहम्मद शामी (भारत) १२३
- झहीर खान (भारत) ११९
Web Title: ENG vs IND 1st Test Jasprit Bumrah Create History Now He Has Most Test Wickets By An Asian Bowler In The SENA Countries Surpassing Wasim Akram
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.