मोठी बातमी : IPL 2021चे उर्वरित सामने खेळवण्याच्या BCCIच्या प्रयत्नांना धक्का; इंग्लंडहून आले महत्त्वाचे अपडेट्स!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील उर्वरित सामने खेळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न बीसीसीआय करताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 02:45 PM2021-05-25T14:45:47+5:302021-05-25T14:47:19+5:30

whatsapp join usJoin us
ENG v IND 2021: England-India Test series schedule unlikely to change to accommodate IPL 14: Report | मोठी बातमी : IPL 2021चे उर्वरित सामने खेळवण्याच्या BCCIच्या प्रयत्नांना धक्का; इंग्लंडहून आले महत्त्वाचे अपडेट्स!

मोठी बातमी : IPL 2021चे उर्वरित सामने खेळवण्याच्या BCCIच्या प्रयत्नांना धक्का; इंग्लंडहून आले महत्त्वाचे अपडेट्स!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील उर्वरित सामने खेळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न बीसीसीआय करताना दिसत आहेत. त्यासाठीच बीसीसीआयनं भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करण्याची विनंती इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाकडे ( ECB) केली होती. ४ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. पण, आयपीएल २०२१च्या उर्वरित ३१ सामन्यांच्या आयोजनासाठी भारत-इंग्लंड मालिकेत थोडा बदल बीसीसीआयला अपेक्षित आहे. त्यांच्या या प्रयत्नांना सुरूंग लागल्याची बातमी समोर येत आहे. (  England-India Test series schedule unlikely to change to accommodate IPL 14) . PTIनं दिलेल्या वृत्तानुसार या दोन मंडळांमधील चर्चा फिस्कटली आहे. 

''ECB कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात बदल करणे अवघड आहे. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे  कोणतीच विनंती करण्यात काहीच अर्थ नाही. ECB २४ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत हंड्रेड लिग खेळवण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे या वेळापत्रकात बदल होण्याची संधी फार कमी आहे,''असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले.  पहिल्या विकेटसाठी चार फलंदाजांची ४०८ धावांची भागीदारी, चौघांचेही शतक; क्रिकेटच्या इतिहासातील अजुबा!

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल १८ ते २३ जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर सहा आठवड्यानंतर भारत-इंग्लंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. नॉटिंगहॅम ( ४ ते ८ ऑगस्ट), लॉर्ड्स ( १२ ते १६ ऑगस्ट), लीड्स ( २५ ते २९ ऑगस्ट), ओव्हल ( २ ते ६ सप्टेंबर) आणि मँचेस्टर ( १० ते १४ सप्टेंबर) असे पाच कसोटी सामने होणार आहेत.

काय आहे शक्यता?
ईसीबीने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतील ९ दिवसांचे अंतर चार दिवसांवर आणले तर बीसीसीआयला आयोजनासाठी ५ दिवस अतिरिक्त मिळतात. बीसीसीआयकडे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत आयपीएलचे आयोजन करण्यासाठी ३० दिवसांचा वेळ आहे. मात्र याच कालावधीत डबल हेडर सामन्यांची संख्या वाढवून बीसीसीआयला सामने संपवावे लागतील. त्यात चार बाद फेरीचे सामने देखील आहेत. 

जर बीसीसीआय आणि ईसीबीत चर्चा झाली नाही. तर बीसीसीआयला ३० दिवसांतच सर्व ३१ सामन्यांचे आयोजन करावे लागेल. त्यात चार बाद फेरीचे सामने देखील आहेत.  त्यात आठ दिवस डबल हेडर सामने घ्यावे लागतील. म्हणजेच या चार अठवड्यांच्या शेवटच्या दोन दिवसांत १६ सामने होतील. तसेच याच काळात मालिका संपल्यावर भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना युएईत देखील आणावे लागेल.
 

Web Title: ENG v IND 2021: England-India Test series schedule unlikely to change to accommodate IPL 14: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.