Join us  

इडन गार्डन्स स्टेडियम रंगले गुलाबी रंगात; बांगलादेशविरुद्ध यजमान भारताचे पारडे जड

भारतीय क्रिकेटमधील ऐतिहासिक क्षण; रात्र कसोटी सामना आजपासून; चाहत्यांमध्ये सामन्याची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 1:53 AM

Open in App

कोलकाता: भारतीय क्रिकेट अखेर गुलाबी रंगात न्हाऊन निघण्यास सज्ज झाले आहे. बांगलादेशविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या ऐतिहासिक दिवस- रात्र कसोटीत भारताचे पारडे जड मानले जात आहे. भारताचा हा पहिलाच सामना असला तरी जागतिक क्रिकेटमधील हा १२ वा दिवस- रात्र कसोटी सामना ठरणार आहे.माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयने गुलाबी चेंडूने सामना खेळविण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला. त्यासाठी कर्णधार विराट कोहलीचे मन वळविलेच शिवाय अल्पावधीत बांगलादेशलाही तयार केले. ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड यांच्यात गुलाबी चेंडूने कसोटीला सुरुवात झाल्यापासून क्रिकेटविश्वात ११ दिवस-रात्र कसोटी सामने झाले.इडन गार्डन्सला सामन्यानिमित्त गुलाबी रंगात सजविण्यात आले आहे. पहिल्या चार दिवसांची सर्व तिकीटे संपली असून गुलाबी रंगाचा मोठा चेंडू शुभंकर म्हणून इडनच्या आकाशात डौलाने मिरवित आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रख्यात खेळाडूंसह अनेक राजकीय व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही या सामन्यासाठी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे, याआधी सेनादलाचे पॅराट्रुपर दोन्ही कर्णधारांना गुलाबी चेंडू सोपवणार होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही योजना रद्द करण्यात आल्याचे बंगाल क्रिकेट संघटनेने (कॅब) स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)पहिल्या दिवशी दिग्गज खेळाडूंचा सत्कार होईल, शिवाय यावेळी प्रसिद्ध गायकांची संगीताची मेजवानी असेल. मोहम्मद शमी, इशांत शर्मा व उमेश यादव या वेगवान त्रिकूटाने इंदूर येथील पहिली कसोटी एक डाव १३० धावांनी जिंकून दिली होती. इडनवर याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. फलंदाजीत रोहित शर्मा व मयांक अगरवाल शानदार फॉर्ममध्ये आहेत.काही भारतीय खेळाडूंना दुलिप चषक स्पर्धेत प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव आहे. बांगलादेश मात्र प्रथमच या चेंडूला सामोरा जाईल. इंदूरमध्ये बांगलादेशची फलंदाजी कुचकामी ठरली. केवळ मुशफिकूर रहिम अर्धशतक करु शकला. शकिब अल हसनच्या निलंबनामुळे नेतृत्व करणारा मोमिनूल हक दडपण झुगारण्यात अपयशीच ठरला.सराव सामना हवा होता - मोमिनूल‘भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध दिवस- रात्र कसोटी खेळण्याआधी गुलाबी चेंडूचा सराव सामना आयोजित व्हायला हवा होता,’ असे बांगलादेशचा कर्णधार मोमिनूल हक याने म्हटले आहे. ‘सराव सामना खेळण्याची संधी न मिळताच ही कसोटी आयोजित करण्यात आली, त्याला आम्ही काहीही करू शकत नाही. आम्ही केवळ मानसिक तयारी केली आहे. गुलाबी चेंडूला सामोेरे जाण्याआधी किमान एक सराव सामना असायला हवा होता,’ अशी इच्छा मोमिनूलने सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केली.प्रतिस्पर्धी संघभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन,रवींद्र जडेजा, रिषभ पंत, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, हनुमा विहारी, कुलदीप यादव आणि शुभमन गिल.बांगलादेश : मोमिनूल हक (कर्णधार), लिटन दास, मेहदी हसन, नईम हसन, अल अमीन हुसेन, इबादत हुसेन, मुसद्दक हुसेन, शादमान इस्लाम,तायजुल इस्लाम, अबु जायेद, इमरूल कायेस, महमूदुल्लाह, मोहम्मद मिथून, मुशफिकूर रहीम आणि मुस्ताफिजूर रहमान. 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेश