गेल्या चोवीस तासांत देशात २,८१,३८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ३,७८,७४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आऱ अश्विन ( R Ashwin) च्या घरातील १० सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच इंडियन प्रीमिअर लीगमधून ( IPL 2021) त्यानं माघार घेत घरच्यांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आर अश्विन त्यानंतर सोशल मीडियावरून सातत्यानं कोरोना संदर्भात जनजागृती करत आहे. पण, रविवारी त्यानं एक चूकीचं ट्विट केलं. त्यानं ट्विटमध्ये लोकांची गर्दी जमलेला फोटो पोस्ट करून नाराजी व्यक्त केली होती आणि सर्वांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा असं आवाहनही केलं होतं. पण, त्यानं सोमवारी एक ट्विट करून आपली चूक मान्य केली.
त्यानं ट्विट केलं की,''काल मी एक फोटो पोस्ट केला. त्यात रेशन दुकानाबाहेर गर्दी जमल्याचे मी सांगितले होते. पण, मी माफी मागतो. ती गर्दी औषधांसाठी झाली होती. प्रत्येकाला आपल्या प्रियजनाची काळजी होती आणि त्यापोटी त्यांची ती धडपड होती. तरीही कृपया करून अशी गर्दी करणं टाळा.