Join us

न्यूझीलंडमधील पहिल्या मालिका विजयाची उत्सुकता; विराट सेना ऐतिहासिक कामगिरीच्या निर्धाराने खेळणार

भारतीय संघ सध्या शानदार फॉर्मात आहे आणि २०१९ विश्वचषक स्पर्धेनंतर भारताने ज्या पाच टी२० मालिका खेळल्या त्यात शानदार कामगिरी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 04:35 IST

Open in App

हॅमिल्टन : आतापर्यंत खेळाच्या प्रत्येक विभागात शानदार कामगिरी करणारा भारतीय संघ बुधवारी येथे होणाऱ्या तिसºया लढतीत न्यूझीलंडमध्ये पहिली टी२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. भारताने आॅकलंडमध्ये पहिले दोन टी२० आंतरराष्ट्रीय सामने अनुक्रमे सहा व सात गडी राखून जिंकले आणि पाच सामन्याच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.सेडन पार्कमध्ये सलग तिसºया सामन्यातील विजयाने भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये प्रथमच टी२० मालिका जिंकण्यात यशस्वी ठरेल. त्याआधी, दोनदा भारताला अशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. भारताने २००८-०९ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ०-२ ने, तर गेल्या वर्षी १-२ ने मालिका गमावली होती.भारतीय संघ सध्या शानदार फॉर्मात आहे आणि २०१९ विश्वचषक स्पर्धेनंतर भारताने ज्या पाच टी२० मालिका खेळल्या त्यात शानदार कामगिरी केली आहे. त्यात सध्या सुरू असलेल्या मालिकेचाही समावेश आहे. दरम्यान भारताने केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकलेली नाही. ही मालिका १-१ ने बरोबरीत संपली होती, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.सर्वांची नजर सध्या आॅस्ट्रेलियात यंदा वर्षाच्या अखेर होणाºया टी२० विश्वचषक स्पर्धेवर आहे, पण संघ व्यवस्थापनाला विश्वास आहे की या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी योग्य वेळी सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांची या मालिकेतील कामगिरी बघितल्यानतंर व्यवस्थापनाचा विश्वासाला बळ मिळाले आहे.या सर्व बाबींचा विचार करता तिसºया सामन्यासाठी भारतीय संघ कुठला मोठा बदल होण्याची शक्यता नाही. मंगळवारी एच्छिक सराव सत्र होते आणि त्यात कर्णधार विराट कोहली, राहुल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचा सहभाग नव्हता.संघ व्यवस्थापन मालिकेत आतापर्यंत खेळायची संधी न मिळालेल्या खेळाडूंवर विशेष लक्ष देत आहे. रवी शास्त्रीने वॉशिंग्टन सुंदरवर लक्ष दिले, तर फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतसोबत व्यस्त होते. पण, या दोघांना बुधवारच्या लढतीत संधी मिळण्याची शक्यता नाही. मैदान लहान असल्यामुळे कुलदीप यादवला पहिल्या दोन सामन्यात संधी मिळाली नाही. लहान मैदानावर फलंदाज त्याला सहज टार्गेट करू शकतात. चहलने चांगली गोलंदाजी केली. आता सामने मोठ्या मैदानावर खेळल्या जाणार आहेत त्यामुळे कुलदीपला संधी मिळते का, याबाबत उत्सुकता आहे. तसे बघता चहल व यादव एकत्र खेळण्याची शक्यता धुसर आहे.न्यूझीलंडकडून कोलिन डी ग्रँडहोमकडे छाप सोडण्याची ही अखेरची संधी आहे. अंतिम दोन टी२० सामन्यात फलंदाज टॉम ब्रुस या अष्टपैलूचे स्थान घेईल. ग्रँडहोम या मालिकेत फलंदाज म्हणून खेळला, पण त्याला छाप सोडता आली नाही. न्यूझीलंडसाठी सर्वांत मोठा चिंतेची विषय आहे जसप्रीत बुमराह.दोन्ही लढतींमध्ये त्यांचे फलंदाज बुमराहचा मारा समजण्यात अपयशी ठरले होते. न्यूझीलंडची सेडन पार्कमधील कामगिरी चांगली आहे. येथे त्यांनी आतापर्यंत ९ टी२० सामन्यांपैकी ७ जिंकले आहेत. ते भारताला विजयी आघाडीपासून रोखण्यासाठी प्रयत्नशील राहील. (वृत्तसंस्था)- टी२० क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्मात असल्यानंतरही आयसीसी क्रमवारीत भारताच्या क्रमवारीत विशेष बदल झालेला नाही. भारत आता टी२० क्रमवारीत पाचव्या स्थानी असून चौथे स्थान गाठण्यासाठी भारताला सध्या सुरू असलेली मालिका ५-० ने जिंकावी लागेल. न्यूझीलंड सध्या सहाव्या स्थानी असून पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका क्रमवारीमध्ये भारताच्या तुलनेत आघाडीवर आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंड