Join us  

मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूनं खेचले एका षटकात सहा Six; भावाची केली धुलाई

कसोटी सामन्याच्या पदार्पणात त्यानं ( वि. दक्षिण आफ्रिका) ९३ चेंडूंत शतक झळकावले होते आणि मुबंई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमिअर लीग व चॅम्पियन्स लीग जिंकण्याचा पराक्रमही केला आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: December 01, 2020 10:46 AM

Open in App

मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू ड्वेन स्मिथनं ( Dwayne Smith) मंगळवारी ईडन लॉज संघाचे प्रतिनिधित्व करताना एरोल होल्र्डर टी-10 लीगमध्ये भाऊ केमार स्मिथ याच्या पहिल्याच षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला. वेस्ट इंडिजच्या ३७ वर्षीय माजी खेळाडू स्मिथनं २०१५मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. कसोटी सामन्याच्या पदार्पणात त्यानं ( वि. दक्षिण आफ्रिका) ९३ चेंडूंत शतक झळकावले होते आणि मुबंई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमिअर लीग व चॅम्पियन्स लीग जिंकण्याचा पराक्रमही केला आहे. सर व्हिव्ह रिचर्ड यांनी ड्वेन याच्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसत असल्याचे सांगितले होते. मंगळवारी ड्वेननं C.R.B. संघाविरुद्ध स्फोटक खेळी केली. 

अंतिम सामन्याच्या पहिल्याच षटकात केमारच्या गोलंदाजीवर त्यानं सहा षटकार खेचले. केमार हा अजून बार्बाडोसकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेला नाही, परंतु इंग्लिश व्यावसायिक क्रिकेटमध्ये फिरकीपटू केमारनं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ड्वेन फटकेबाजीच्याच मूडमध्ये होता. पहिल्याच षटकात सहा षटकार खेचूनही त्याला ४६ धावांवर माघारी परतावे लागले. अॅश्ली नर्सनं त्याची विकेट घेतली. झालेल्या फटकेबाजीची परतफेड करण्याची केमारला संधी होती, परंतु ड्वेननं पहिल्याच चेंडूवर केमारला बाद केले.  Video : 'तू जन्मलाही नव्हतास तेव्हा मी आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं!'; शाहिद आफ्रिदीनं २१ वर्षीय खेळाडूला झापलं 

ड्वेननं आयपीएलमध्ये ९१ सामन्यांत २३८५ धावा केल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर २६ विकेट्सही आहेत. वेस्ट इंडिजकडून त्यानं १० कसोटी, १०५ वन डे आणि ३३ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावावर ३२०, वन डेत १५६० आणि ट्वेंटी-20त ५८२ धावा आहेत. त्यानं ७५ आंतरराष्ट्रीय विकेट्सही घेतल्या आहेत. कोरोनाचे नियम मोडल्यानं पाकिस्तानी खेळाडूला घरी हाकलले

टॅग्स :वेस्ट इंडिजमुंबई इंडियन्सटी-10 लीग