Join us

NED vs SA: सरकारने डच खेळाडूला हिलाल-ए-पाकिस्तान पुरस्कार द्यावा; पाकिस्तानच्या अभिनेत्रीची मागणी

विश्वचषकातील आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 15:36 IST

Open in App

नवी दिल्ली : विश्वचषकातील आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली आहे. ब गटातून भारत आणि पाकिस्तान यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर अ गटातून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांना उपांत्य फेरीत स्थान मिळाले आहे. नेदरलॅंड्सच्या विजयामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरीचे तिकिट मिळाले आहे. तर आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला त्यामुळे नेदरलॅंड्सच्या संघाचा फायदा झाला आहे. जरी त्यांना उपांत्य फेरी गाठता आली नाही तरीदेखील त्यांना आगामी विश्वचषकात याचा फायदा होणार आहे. 

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून नेदरलॅंड्सच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. डच संघाने २० षटकांत ४ बाद १५८ एवढी धावसंख्या उभारली. डच संघाचा खेळाडू कॉलिन अकरमन याने २६ चेंडूत ४१ धावांची नाबाद ताबडतोब खेळी केली. त्यामुळे कॉलिनला पुरस्कार देण्याची मागणी पाकिस्तानी अभिनेत्रीने केली आहे. अकरमनच्या ताबडतोब खेळीच्या जोरावर नेदरलॅंड्सच्या संघाने आफ्रिकेसमोर १५९ धावांचे सन्मानजनक लक्ष्य ठेवले. लक्षणीय बाब म्हणजे प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत ८ बाद केवळ १४५ धावा करू शकला आणि नेदरलॅंड्सने शानदार विजय मिळवला. 

नेदरलॅंड्सच्या खेळाडूला हिलाल-ए-पाकिस्तान पुरस्कार द्यावाखरं तर नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यामुळे पाकिस्तानला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत जागा मिळाली आहे. नेदरलॅंड्सच्या या विजयामुळे शेजारील देश पाकिस्तानमध्ये एकच जल्लोष झाला. अशातच पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने ट्विट करून सर्वांचेच लक्ष वेधले आहे. "तुम्ही सहमत असाल तर रिट्विट करा, डच खेळाडू कॉलिन अकरमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सरकारने हिलाल-ए-पाकिस्तान पुरस्कार दिला पाहिजे." अशा शब्दांत अभिनेत्रीने नेदरलॅंड्सच्या खेळाडूचे कौतुक केले आहे. 

पाकिस्तानच्या मदतीला नेदरलॅंड्स आला धावून दक्षिण आफ्रिकेचा पराभव केवळ पाकिस्तानसाठी आवश्यक नव्हता तर नेदरलँडसाठीही तो खूप महत्त्वाचा होता. कारण यानंतर हे कॉम्बिनेशन केले जात होते की जर पाकिस्तानने बांगलादेशला हरवले तर नेदरलँड्स पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर येईल. जे त्यांना पुढील टी-२० विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यासाठी मदतशीर असेल. नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स सामन्यानंतर म्हणाला, "आणखी एक चांगला अनुभव आला, नेदरलँड्सच्या संघाने आणखी एक मोठी उलटफेर केली. पहिले दोन सामने गमावल्यानंतर, आमच्यासाठी लक्ष्य हे होते की आम्ही अजूनही पुढील विश्वचषकासाठी थेट पात्र होण्यासाठी खेळत आहोत. त्यामुळे दोन निकाल आमच्या बाजूने आले." 

पाकिस्तानची उपांत्य फेरीत धडकदुसरीकडे, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, विजयासाठी १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ केवळ १४५ धावा करू शकला. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला, तर पाकिस्तानने बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानद. आफ्रिकाबांगलादेश
Open in App