Join us  

भारत-वेस्ट इंडिज सामन्यात येऊ शकतो पावसाचा व्यत्यय; जाणून घ्या पीच रिपोर्ट

या सामन्याच्यावेळी पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 7:16 PM

Open in App

मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सामन्याच्यावेळी पावसाचा व्यत्यय येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे हा सामना होणार की नाही, याबद्दल संदिग्धता आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला सामना ६ डिसेंबरला हैदराबादला होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना ८ डिसेंबरला तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. या सामन्याच्यावेळी पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या मैदानाच्या क्युरेटरने दिलेल्या माहितीनुसार, या सामन्यात पाऊस पडू शकतो. पण खेळपट्टीही फलंदाजीसाठी पोषक बनवण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यात जास्त धावा होतील. 

वेस्ट इंडिजचा वन डे संघः सुनील अ‍ॅब्रीस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, किरॉन पोलार्ड ( कर्णधार), शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर. 

वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 संघः फॅबियन अ‍ॅलेन, ब्रँडन किंग, डेनेस रामदिन, शेल्डन कोट्रेल, एव्हिन लुईस, शेरफान रुथरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पिएर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड ( कर्णधार, हेडन वॉल्श ज्युनियर, किमो पॉल, निकोलस पूरण, केस्रीक विलियम्स.

विंडीज मालिकेचे वेळापत्रक⦁    ट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - हैदराबाद8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - मुंबई ⦁    वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतवेस्ट इंडिज