Join us  

फिजिओच्या चुकीमुळे वृद्धिमान साहाचे करीअर धोक्यात

बीसीसीआयच्या एका फिजिओच्या चुकीमुळे साहाचे करीअर धोक्यात आले आहे. फिजिओने केलेल्या चुकीमुळेच साहाला इंग्लडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळू शकलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 5:00 PM

Open in App
ठळक मुद्देफिजिओच्या एका चुकीमुळे साहाला आता खांद्यवर शस्त्रक्रीया करावी लागणार आहे.

बंगळुरु : आपल्या गुणवत्तेच्या जोरावर यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने भारतीय संघात स्थान पटकावले. पण बीसीसीआयच्या एका फिजिओच्या चुकीमुळे साहाचे करीअर धोक्यात आले आहे. फिजिओने केलेल्या चुकीमुळेच साहाला इंग्लडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळू शकलेली नाही. साहाचे हे नुकसान तो फिजिओ किंवा बीसीसीआय भरून देणार का, हा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे.

साहाला आयपीएलदरम्यान अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे काही सामन्यांमध्ये त्याला खेळताही आले नव्हते. दुखापतीवर उपचार घेतल्यावर साहा बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झाला. या अकादमीतील एका फिजिओने त्याला काही व्यायामप्रकार सांगितले. या व्यायामप्रकारामुळे आता साहाला खांद्याची दुखापत झाली आहे. आता जर साहाला खेळायचे असेल तर त्याच्यासाठी खांद्यावर शस्त्रक्रीया करावी लागेल.

फिजिओच्या एका चुकीमुळे साहाला आता खांद्यवर शस्त्रक्रीया करावी लागणार आहे. या शस्त्रक्रीयेनंतरही साहाला थेट मैदानात उतरता येणार नाही. या शस्त्रक्रीयेनंतर पुनर्वसनामध्ये त्याला हे वर्ष गमवावे लागणार आहे. तो जायबंदी असल्याने कसोटी संघात दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत यांना संधी देण्यात आली आहे.

टॅग्स :वृद्धिमान साहाक्रिकेटइंग्लंड विरुद्ध भारत