Join us  

दिल्लीत टी२० सामन्याचे आयोजन करू नका!; बीसीसीआयला पत्र लिहून केली विनंती

पर्यावरण तज्ज्ञ : ; २०१७ सालच्या सामन्याची करुन दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 2:22 AM

Open in App

नवी दिल्ली : पर्यावरण तज्ज्ञांनी भारत -बांगलादेश यांच्यात ३ नोव्हेंबर रोजी आयोजित टी२० सामन्याचे आयोजन करू नये, अशी विनंती करणारे पत्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना लिहिले आहे. वेगाने वाढणारे प्रदूषण खेळाडू तसेच हजारो प्रेक्षकांसाठी धोकादायक ठरू शकते,असा इशारा तज्ज्ञांनी दिला.

दिवाळीतील आतषबाजीमुळे दिल्लीतील वायूप्रदुषणात वेगाने वाढ झाली. डिसेंबर २०१७ ला श्रीलंकेचे खेळाडू येथे मास्क घालून खेळले होते. त्यातील काही खेळाडू नंतर आजारीही पडले. पर्यावरणाबाबत जागरूकता पसरविणाऱ्या संस्थेच्या ज्योती पांडे आणि रवीना राज यांनी बीसीसीआया पत्रात लिहिले,‘दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे टी२० सामना दिल्लीबाहेर आयोजित करावा, अशी आम्ही नम्र विनंती करीत आहोत.’

दिल्लीतील विषयुक्त हवेत तीन- चार तास खेळणारे खेळाडू आणि त्यांचा खेळ पाहणाºया हजारो प्रेक्षकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तब्बेतीची काळजी घेणाºया हजारो लोकांचे नुकसान होऊ नये यासाठी सामना इतरत्र खेळविला जावा, असे दोघींनी म्हटले आहे. सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या सामन्यावर प्रदूषणाचा परिणाम होणार नाही,अशी अपेक्षा व्यक्त केली होती. दिल्ली सरकार हवेतील प्रदूषण दूर करून शुद्ध आणि मोकळी हवा घेता यावी, यासाठी उपाययोजना करीत असल्याची त्यांनी ग्वाही दिली होती.

टॅग्स :भारत