मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार म्हणून यशस्वी आहेच, शिवाय यष्टिमागे त्याचे चातुर्य सर्वांना अवाक् करणारे आहे. धोनीपेक्षा जलद आणि चतुराईने स्टम्पिंग करणारा यष्टिरक्षक मिळणे कठीणच. पण, एक महिला खेळाडू धोनीपेक्षा जलद स्टम्पिंग करते, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही. पण, हे खरं आहे. इंग्लंडची सारा टेलर हीने दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट सामन्यात केलेल्या स्टम्पिंगची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
![]()
अशी स्टम्पिंग करण्याची तिची ही पहिलच वेळ नाही. याआधीही तिने असे आश्चर्यकारक स्टम्पिंग अनेकदा केले आहेत.