Join us
Daily Top 2Weekly Top 5

हे तुम्हाला माहिती आहे का... विराट कोहली घालतो अनुष्काचे टी-शर्ट, फोटो झाला वायरल

विराटचा सध्याच्या घडीला एक फोटो वायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्याने चक्क अनुष्काचे टी-शर्ट घातल्याचे स्पष्ट दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 15:45 IST

Open in App
ठळक मुद्देबर्मिंगहम कसोटीमध्ये जेव्हा कोहलीने शतक झळकावले तेव्हा त्याने अनुष्काने दिलेल्या अंगठीला मैदानात किस केला होता.

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे प्रेम जगजाहीर आहे. या दोघाचं प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. आता तर कोहली आमचं मस्त चाललंय, असं जाहीररीत्या सांगतो. पण विराटचा सध्याच्या घडीला एक फोटो वायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्याने चक्क अनुष्काचे टी-शर्ट घातल्याचे स्पष्ट दिसत आहे.

इंग्लंड दौऱ्या विराटने दमदार कामगिरी केली. पाच सामन्यांमध्य त्याने ५९३ धावा केल्या. पण भारताला मात्र ही मालिका गमवावी लागली. या मालिकेत बर्मिंगहम कसोटीमध्ये जेव्हा कोहलीने शतक झळकावले तेव्हा त्याने अनुष्काने दिलेल्या अंगठीला मैदानात किस केला होता.

 

सध्याच्या घडीला वायरल झालेल्या फोटोनुसार एका टी-शर्टवर लाल रंगात बदाल असून त्याखाली 'A' काढण्यात आला आहे. अनुष्काने यापूर्वी हे टी-शर्ट घातले होते. ते कोहलीने घातल्याचे दिसत आहे. असेच अजून एक अनुष्काचे टी-शर्ट विराटने घातल्याचे दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले असून त्यावर बऱ्याच कमेंटही येत आहेत.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा