Join us  

अबब! १९२ कोटींचा घटस्फोट? ७ वर्षांच्या संसारानंतर दिग्गज खेळाडूनं घेतला काडीमोड

ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत सर्वाधिक 5 वन डे वर्ल्ड कप जिंकलेले आहेत. त्यापैकी एका वर्ल्ड कप विजयात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या यशस्वी कर्णधारानं गुरुवारी घटस्फोट घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 10:15 AM

Open in App

ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत सर्वाधिक 5 वन डे वर्ल्ड कप जिंकलेले आहेत. त्यापैकी एका वर्ल्ड कप विजयात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या यशस्वी कर्णधारानं गुरुवारी घटस्फोट घेतला. सात वर्षांच्या संसारानंतर ऑसी दिग्गज आणि त्याच्या पत्नीनं सामंजस्यानं काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. परदेशात घटस्फोट ही काही धक्कादायक बाब नसली तरी ऑसी दिग्गजाचा हा घटस्फोट वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. हा घटस्फोट 192 कोटींना पडल्याचे वृत्त एका ऑस्ट्रेलियन वेबसाईटनं दिलं आहे. त्यामुळे सध्या ऑसी दिग्गजाच्या घटस्फोटाची चर्चा रंगत आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क आणि त्याची पत्नी कायली यांनी सात वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी एक स्टेटमेंट जाहीर करून त्यांच्या घटस्फोटाची माहिती सर्वांना दिली. सौहार्दपूर्ण वातावरणात हा निर्णय घेतल्याचं दोघांनी सांगितलं. क्लार्क आणि कायली यांनी 2012मध्ये लग्न केलं आणि त्यांना चार वर्षांची केलसी ली ही मुलगी आहे. मागील पाच महिन्यांपासून हे दोघंही वेगळे राहत होते, परंतु त्यांनी त्यावेळी काहीच घोषणा केली नव्हती. त्यांनी सामंजस्यानं हा निर्णय घेतला असून क्लार्क आणि कायली यांनी सह-पालकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. 

''सात वर्ष संसार केल्यानंतर आम्ही एक अवघड निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांच्या सहमतीनं विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. आम्हाला एकमेकांचा आदर आहे. आमच्या मुलीचा आम्ही दोघंही सांभाळ करणार आहोत,'' असं स्टेटमेंट या जोडीनं दिलं. दी ऑस्ट्रेलियनच्या माहितीनुसार हे घटस्फोट 40 मीलियन ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच 192 कोटी रुपयांचे ठरलं. आता क्लार्क त्याच्या बोंडी येथील 8 मीलियन डॉलर किमतीच्या घरात शिफ्ट होणार आहे, तर कायली सध्या आहे त्याच घरात मुलीसह राहणार आहे. 

मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं 2015मध्ये पाचव्यांदा वन डे वर्ल्ड कप जिंकला. त्यानं 115 कसोटी, 245 वन डे आणि 34 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत मिळून 17000 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा सर्वात उत्तम फलंदाज म्हणून क्लार्क ओळखला जातो. त्यानं 2015मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 

क्लार्कनं सोडलं आलीशान आयुष्य अन् तोडलं मॉडल लारा बिंगलशी नातंसीडनी वेस्टफिल्ड स्पोर्ट्स हायस्कूलमध्ये विद्यार्थी म्हणून 1990मध्ये क्लार्क आणि कायली यांची पहिली भेट झाली. पण, त्यानंतर क्लार्क आणि प्रसिद्ध मॉडल लारा बिंगल यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या. क्लार्क आणि बिंगल यांची 2007मध्ये भेट झाली. त्यांच प्रेमप्रकरण आठ वर्ष टिकलं. बिंगल हीचे तिच्या Ex बॉयफ्रेंड सोबतचे नग्न फोटो व्हायरल झाल्यानंतर क्लार्कनं तिच्याची ब्रेक अप केलं. 

टॅग्स :मायकेल क्लार्कघटस्फोट