नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) कॅरेबियन प्रीमिअर लीगचे (सीपीएल) एक आठवडा किंवा १० दिवसांपूर्वी आयोजित करण्याबाबत वेस्ट इंडिज (सीडब्ल्यूआय) बोर्डसोबत चर्चा करीत आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन सप्टेंबरमध्ये करण्याच्या निर्णय घेतला आहे. बीसीसीआय खेळाडूंचे एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये कुठल्याही अडथळ्याविना स्थानांतर करण्यास प्रयत्नशील आहे.
कोरोना महामारीमुळे आयपीएलला काही सामन्यांनंतर स्थगित करावे लागले. बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन सप्टेंबरमध्ये यूएईत करण्याला शनिवारी मंजुरी दिली. सीपीएलला २८ ऑगस्टपासून प्रारंभ होणार असून फायनल १९ सप्टेंबरला खेळल्या जाणार आहे तर आयपीएलचे उर्वरित सामने १८ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत आयोजित होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितमध्ये खेळाडूंसाठी दोन्ही लीगमध्ये सहभागी होणे कठीण आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले, ‘आमची क्रिकेट वेस्ट इंडिजसोबत चर्चा सुरू आहे. जर सीपीएल काही दिवस आधी संपली तर आम्हाला खेळाडूंना एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये स्थानांतरित करण्यास मदत मिळेल. त्यामुळे खेळाडू योग्यवेळी दुबईत पोहोचतील व तीन दिवसांचा अनिवार्य विलगीकरण कालावधी पूर्ण करू शकतील.’ जर बीसीसीआय व सीडब्ल्यूआय यांच्यादरम्यान समझोता झाला नाही तर काही अव्वल खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकतील. या खेळाडूंमध्ये किरोन पोलार्ड, ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, निकोलस पूरण, फॅबियन एलेन, किमो पॉल, सुनील नरेन यांच्या व्यतिरिक्त त्रिनिदाद अँड टोबॅगोचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांचाही समावेश आहे. मॅक्युलम कोलकाता नाइट रायडर्सचे प्रशिक्षक आहेत.
स्मित पटेल खेळणार कॅरेबियन प्रीमियर लीग
मुंबई : युवा यष्टीरक्षक फलंदाज आणि २०१२ च्या १९ वर्षा आतील विश्व कप विजेत्या संघाचा सदस्य स्मित पटेल आगामी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे. गेल्या वर्षी प्रवीण तांबे त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाचा भाग होता.त्याने विजेतेपद पटकावले. आता पटेल हा बार्बाडोस ट्रायडेंट्सकडुन खेळणार आहे. स्मित याने वृत्तसंस्थेला याची माहिती दिली.
सीपीएल २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर मध्ये या स्पर्धेत खेळणार आहे. पटेल याने सांगितले की, ही स्पर्धा खेळण्यासाठी तो ऑगस्टमध्ये वेस्टइंडिजला रवाना होणार आहे.’त्यासाठी त्याला देशांतर्गत क्रिकेट देखील सोडावे लागणार आहे. कारण बीसीसीआयच्या नियमानुसार विदेशी लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला देशातंर्गत क्रिकेट खेळता येत नाही.