Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टोक्सच्या भविष्यावरून चर्चेला उधाण

मारहाणीच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या इंग्लंडचा स्टार बेन स्टोक्स याच्या भविष्यावरून चर्चेचा उधाण आले आहे. त्याला शिक्षा व्हायला हवी होती की नाही, याविषयी माजी खेळाडूंमध्ये मतभेद दिसले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 03:54 IST

Open in App

लंडन - मारहाणीच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या इंग्लंडचा स्टार बेन स्टोक्स याच्या भविष्यावरून चर्चेचा उधाण आले आहे. त्याला शिक्षा व्हायला हवी होती की नाही, याविषयी माजी खेळाडूंमध्ये मतभेद दिसले.मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे खेळल्यानंतर काही तासांत स्टोक्सने ब्रिस्टलमध्ये मारहाण केल्याचा स्टोक्सवर आरोप होता.न्यूझीलंडमध्ये जन्मलेला २७ वर्षांच्या या अष्टपैलू खेळाडूला न्यायालयाने निर्दोष सोडले तरी क्रिकेट शिस्तपालन आयोगाकडून त्याची विचारपूस होणार आहे. डर्बीशायरचे माजी फलंदाज आणि वकील टिम ओगार्मन हे चौकशी आयोगाचे प्रमुख आहेत. स्टोक्सचा सहकारी अ‍ॅलेक्स हेल्स यालादेखील चौकशीस सामोरे जावे लागेल. इंग्लंडचे माजी दोन कर्णधार माईक आथर्टन आणि नासिर हुसेन यांच्यात स्टोक्सच्या पुढील शिक्षेबाबत एकमत नाही.इंग्लंडसाठी ११५ सामने खेळलेला आथर्टन म्हणाला,‘न्यायालयाने निर्दोष ठरविल्यानंतर स्टोक्सला कुठलीही शिक्षा होऊ नये. ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहिले जाते त्यांच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा नसते.’ नासिर हुसेन याने आथर्टनच्या विरुद्ध मत मांडले. तो म्हणाला,‘सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे सत्य दिसत आहे, त्याकडे ईसीबीला डोळेझाक करता येणार नाही.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :बेन स्टोक्सक्रिकेट