Join us

चर्चा रंगली बुमराहच्या संजना गणेशनची, गुगलवर होतेय सर्च; जाणून घ्या ती नेमकी आहे तरी कोण?

संजना गणेशन ‘स्प्लिट्स व्हिला ७’ या रिएलिटी शोमध्ये दिसली होती. या शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडेल होती. संजनाने ‘फेमिना ऑफिशियली गॉर्जियस’ हा किताब जिंकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 06:58 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने संजना गणेशन या टीव्ही प्रेझेंटर असलेल्या  मुलीसोबत रविवारी गोव्यात मोजक्या नातेवाइकांच्या साक्षीने विवाह केला. या लग्न सोहळ्याचे फोटो बुमराह दाम्पत्याने नंतर सोशल मीडियावर शेअर केले. बुमराहच्या चाहत्यांना मात्र संजनाबाबत ‘खास’ उत्सुकता आहे. बुमराहसोबत सात फेरे घेणारी संजना आहे तरी कोण?, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.संजना गणेशन ‘स्प्लिट्स व्हिला ७’ या रिएलिटी शोमध्ये दिसली होती. या शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडेल होती. संजनाने ‘फेमिना ऑफिशियली गॉर्जियस’ हा किताब जिंकला आहे. त्यानंतर २०१२ मध्ये तिने ‘फेमिना स्टाईल दिवा’मध्ये भाग घेतला होता. २०१४ मध्ये संजना ‘फेमिना मिस इंडिया पुणे’ या स्पर्धेची फायनलिस्ट होती. स्पोर्ट्‌स अँकर संजनाने २०१९ मध्ये क्रिकेट विश्वचषकात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर ‘मॅच पॉईंट’ शोचे सूत्रसंचालन केले होते. स्टार स्पोर्ट्सचा ती ‘फेमस’ चेहरा बनली आहे. आयपीएलमध्ये संजना कोलकाता नाईट रायडर्स संघाशी जुळली आहे. केकेआरचा शो ती स्वत: संचालित करते. बुमराहने २०१६ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तो १९ कसोटी, ६७ वन डे आणि ४९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.

सुवर्ण पदक विजेती संजनासंजनाचा जन्म ६ मे १९९१ रोजी पुणे शहरात झाला. शालेय शिक्षण बिशप शाळेमध्ये झाले. त्यानंतर सिम्बॉयसिसमधून बी.टेक. पूर्ण केले. सिम्बॉयसिसमध्ये असताना संजनाने सुवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर संजना आयटी आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्राकडे वळली. त्याचवेळी अँकर म्हणून काम करायला सुरुवात केली.

आघाडीच्या क्रीडा वाहिनीसोबतसूत्रसंचालन म्हणून काम करत संजना घराघरात पोहोचली. 

टॅग्स :संजना गणेशनजसप्रित बुमराह