Join us  

' त्या' वादामुळे राहुल द्रविडने BCCI कडे केला हा खुलासा

या आरोपानंतर द्रविड यांना आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिवल्स संघाचे प्रशिक्षकपद सोडावे लागले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 4:20 PM

Open in App
ठळक मुद्दे यावेळीही त्यांच्यावर हेच आरोप करण्यात आले असून त्यांनी याबाबत बीसीसीआयला खुलासा केला आहे.

नवी दिल्ली : भारताचा माजी महान क्रिकेटपटू आणि 19-वर्षांखालील भारतीय विश्वविजेत्या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे सध्या एका नव्या वादामध्ये सापडले आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर परस्पर हितसंबंध जपल्याचे आरोप झाले होते. यावेळीही त्यांच्यावर हेच आरोप करण्यात आले असून त्यांनी याबाबत बीसीसीआयला खुलासा केला आहे.

आयपीएलधील एका संघाचे प्रशिक्षकपद द्रविड यांच्याकडे होते. त्याचबरोबर ते भारताच्या 19-वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद होते. त्यामुळे ही दोन्ही पदे एकत्र भूषवणे म्हणजे परस्पर हितसंबंध जपण्यासारखे आहे, असा आरोप त्यांच्यावर केला होता. या आरोपानंतर द्रविड यांना आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिवल्स संघाचे प्रशिक्षकपद सोडावे लागले होते. पण यावेळी प्रकरण मात्र थोडे निराळे आहे.

बेंगळुरुमध्ये पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सीलेंस ही अकादमी बनवण्यात आली आहे. या अकादमीमध्ये बॅडमिंटन, क्रिकेट, टेनिस, स्क्वॉश, फुटबॉल आणि जलतरणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. द्रविड या अकादमीमध्ये सल्लागार समितीचे उपाध्यक्ष आहेत, अशी माहिती काही जणांनी दिली आहे. त्याचबरोबर या अकादमीला त्यांचे नाव दिल्यामुळे ही त्यांच्या मालकीची आहे, असेही म्हटले जात आहे.

याप्रकरणी द्रविड यांनी बीसीसीआयला स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, ' या अकादमीमध्ये माझे नाव दिले गेले आहे. पण मी या अकादमीचा मालक नाही किंवा कोणतेही हक्क माझ्याकडे नाहीत. त्यामुळे  परस्पर हितसंबंध जपल्याचा मुद्दा येत नाही.'

द्रविड यांनी बीसीसीआयला खुलासा केला असला तरी अकादमीच्या मालकी हक्काबाबात अजूनही खुलास करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणावर बरीच चर्चा सध्या होत आहे.

टॅग्स :राहूल द्रविडक्रिकेट