Join us  

IPL 2021 Auction : हरणार नाही, लढणार!; ८ वर्ष थांबलो, त्यात आणखी एक वर्ष; एस श्रीसंत प्रचंड नाराज

आयपीएल २०१३  ( IPL 2013) स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर राजस्थान रॉयल्सचा माजी गोलंदाज एस श्रीसंत ( S Sreesanth) याच्यावर आजीवन बंदी घातली गेली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 12, 2021 12:56 PM

Open in App
ठळक मुद्देअर्जुन तेंडुलकरला २० लाखांच्या बेस प्राईज खेळाडूंमध्ये स्थानस्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल यांच्या नावाची चर्चा

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १४व्या पर्वासाठी बीसीसीआयनं गुरुवारी अंति २९२ खेळाडूंची यादी जाहीर केली. १११४ खेळाडूंनी या मिनी लिलावासाठी नावं नोंदवलेली होती. बीसीसीआयनं जाहीर केलेल्या अंतिम यादीतून एस श्रीसंत ( S Sreesanth) याला वगळण्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, या निर्णयानं नाराज झालेल्या केरळच्या गोलंदाजानं सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली. अर्जुन तेंडुलकरच्या नावाला होकार, पण एस श्रीसंत याला नकार; जाणून घ्या नेमका प्रकार!

आयपीएल २०१३  ( IPL 2013) स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर राजस्थान रॉयल्सचा माजी गोलंदाज एस श्रीसंत याच्यावर आजीवन बंदी घातली गेली. त्याविरोधात गोलंदाजानं लढा दिला आणि ही बंदी ८ वर्षांची करण्यात आली. मागील वर्षी त्यानं ही बंदी पूर्ण केली. त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. त्यानं पाच सामन्यांत चार विकेट्स घेतल्या. IPL 2021 Acution list : २९२ खेळाडू, ६१ जागा अन् आयपीएल फ्रँचायझींकडून १९६.६ कोटींचा पाऊस!

श्रीसंतला ७५ लाखांच्या मुळ किंमतीतील यादीत स्थान दिले गेले होते, परंतु एकाही फ्रँचायझीनं त्याच्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे त्याला अंतिम यादीतून वगळले गेले. त्यावर श्रीसंतनं इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून त्याचं मत मांडलं. तो म्हणाला, आयपीएल ऑक्शनसाठीच्या अंतिम यादीत नाव नसल्यानं नाराज झालो आहे. मी लढा देतच राहीन. जर मी ८ वर्ष थांबू शकतो, तर आणखी काही वेळ थांबण्यास हरकत नाही. मी हार मानलेली नाही.''  कुलदीप यादवला संधी नाहीच, 'या' खेळाडूचे पदार्पण; जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI!

पाहा व्हिडीओ..

BIG Highlights of Final players list of IPL Auctions- 2 कोटी मुळ किंमत (  2 crore Base Price ) - केदार जाधव व हरभजन सिंग हे दोनच भारतीय खेळाडू २ कोटींच्या मुळ किंमतीच्या ( base price ) यादीत आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं (  Chennai Super Kings ) रिलीज केलेल्या केदार जाधव ( Kedar Jadhav) याच्यासह हरभजन सिंग, राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि किंग्स इलेव्हन पंजाबकडून डच्चू मिळालेला ग्लेन मॅक्सवेल हे सर्वाधिक मुळ किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये आहेत. 

- १.५ कोटी ( 1.5 crore Base Price) मुळ किंमतीत १२ खेळाडूंचा समावेश आहे. त्यात हनुमा विहारी आणि उमेश यादव या दोनच खेळाडूंचा समावेश आहे. तर १ कोटी मुळ किंमतीच्या यादीत ११ खेळाडू आहेत. 

- २९२ खेळाडूंच्या अंतिम यादीत १६४ भारतीय, १२५ विदेशी आणि ३ संलग्न देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे.  

- महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याचा २० लाखांच्या मुळ किंमतीच्या खेळाडूंमध्ये समावेश केला गेला आहे.

टॅग्स :श्रीसंतआयपीएल २०२१ मिनी ऑक्शनआयपीएल