लंडन : भारताच्या विश्वचषक संघातील दिनेश कार्तिकचा आज वाढदिवस होता. संघातील खेळाडूंसह दिनेशने आपला वाढदिवस साजरा केला. भारतीय संघातील खेळाडूंनी दिनेशसाठी खास केक आणला होता. हॉटेलमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात दिनेशने केक कापत आपला वाढदिवस साजरा केला. बीसीसीआयने दिनेशच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक खास व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोसेट केला आहे.