Join us  

बीसीसीआयनं पाठवलेल्या नोटिशीला दिनेश कार्तिकनं दिलं 'असं' उत्तर...

भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला बीसीसीआयकडून परवानगी न घेता ट्रिनबागो नाइट राइडर्सच्या ड्रेसिंग रुममध्ये गेल्याने बीसीसीआयने त्याला नोटीस बजावली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 4:01 PM

Open in App

मुंबई: भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकलाबीसीसीआयकडून परवानगी न घेता ट्रिनबागो नाइट राइडर्सच्या ड्रेसिंग रुममध्ये गेल्याने बीसीसीआयने त्याला नोटीस बजावली होती. तसेच या नोटीशीला उत्तर देण्यासाठी कार्तिकला सात दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र कार्तिकने या नोटीसबद्दल बीसीसीआयला उत्तर दिले असल्याचे समोर आले आहे.

कार्तिकनं त्याच्या उत्तरात म्हटले की, बीसीसीआयची परवानगी न घेतल्याबद्दल बिनशर्त माफी मागतो, तसेच यापुढे इतर सामन्यात टीकेआरच्या ड्रेसिंग रूममध्ये जाणार नाही असे स्पष्टीकरण त्याने बीसीसीआयला दिले आहे. त्यामुळे बीसीसीआय आता हे प्रकरण मिटवू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सध्या कॅरेबियन प्रीमिअर लीग सुरु आहे. या लीगमध्ये ट्रिनबागो नाइट राइडर्स या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये कार्तिक दिसला होता. बीसीसीआयच्या नियमांनुसार जर खेळाडूला अन्य देशातील ड्रेसिंग रुममध्ये जायचे असेल तर त्यासाठी बीसीसीआयची परवानगी घेणे गरजेचे असते. कार्तिकने ट्रिनबागो नाइट राइडर्सच्या ड्रेसिंग रुममध्ये जाण्याची परवानगी बीसीसीआयकडून घेतली नव्हती. त्यामुळे कार्तिकला बीसीसीआयने नोटीस बजावली होती.

 

टॅग्स :बीसीसीआयदिनेश कार्तिकभारत