Join us

विराटचा हरवलेला फोन युवराजला सापडला? युवीने शेअर केलाय फोटो

विराट कोहलीने ७ फेब्रुवारी रोजी ट्विट करुन आपल्या हरवलेल्या फोनची माहिती दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 13:07 IST

Open in App

टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीचा मोबाईल फोन काही दिवसांपूर्वी हरवलेला होता. विराटने यासंदर्भात ट्विट करुन दु:खही व्यक्त केलं होतं. विराटच्या या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी अनेकांनी त्याची मजा घेतली. विशेष म्हणजे आता भारताजी माजी फलंदाज युवराज सिंगनेही ट्विट करुन विराटच्या हरवलेल्या फोनबद्दल माहिती दिली आहे. तर, तो फोन युवीला सापडला होता की काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. कारण, युवीने विराटचे ते ट्विट रिशेअर करत एक आठवण शेअर केली आहे. 

विराट कोहलीने ७ फेब्रुवारी रोजी ट्विट करुन आपल्या हरवलेल्या फोनची माहिती दिली होती. फोनचा बॉक्स उघडण्यापूर्वीच फोन गायब होणे याएवढे दुसरे दु:ख काय असू शकते, कृपया सर्वांनी माझा फोन शोधण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही विराटने ट्विट करुन म्हटले होते. विराटच्या या ट्विटवर अनेकांनी त्याची खिल्ली उडवली. विशेष म्हणजे कोहलीच्या या ट्विटला झोमॅटोनेही ट्विट करुन उत्तर दिलं होतं. ते ट्विटही चांगलंच व्हायरल झालं होतं. भाभी, (अनुष्का शर्मा) यांच्या फोनवरुन आईस्क्रीमची ऑर्डर करायला संकोच करू नका, असे ट्विट झोमॅटोने केले होते. आता, युवराजसिंगने ही विराटचे ते ट्विट शेअर करत एका बॉक्सचा फोटो शेअर केला आहे. तसेच, काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या खेळीचं विराट कौतुकही केलंय. 

चिक्कू, कालचा विजय काय भारी होता.. असे युवराजने म्हटले. तसेच, एक फोटो शेअर केला असून त्या फोटोत खुर्चीवर एक खाकी कलरचा बॉक्स पडल्याचे दिसून येते. मला हा बॉक्स आमच्या हॉटेलच्या जिमबाहेर सापडला होता. मी तो सरळ माझ्या खोलीत नेला. पण वीरे, मी जेवायला बाहेर पडलो. तेव्हा कोणीतरी तो तिथून घेतला, असा रिप्लाय युवीने दिला आहे. त्यामुळे, विराटचा फोन युवीकडेच तर नाही ना, युवीनेच विराटची टिंगल तर केली नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने नेटीझन्सला पडला आहे.  

टॅग्स :विराट कोहलीयुवराज सिंग
Open in App