मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो. परिस्थिती कितीही खडतर असली तरी धोनीने संयमीपणा खचू दिला नाही. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानावर उतरणार असला तरी त्याला धोनीचा खूप मोठा आधार असणार आहे. चतुर नेतृत्व, शांत डोकं आणि कोणत्याची परिस्थितीला धाडसाने सामोरे जाणाऱ्या धोनीला त्याचे मित्र मात्र 'दहशतवादी' या टोपण नावाने बोलवायचे.
''धोनीनं क्वचितच सुरुवातीचा कर्णधारपद भूषविले असेल, परंतु आता पाहा तो जगातील सर्वोत्तम कर्णधारांच्या पंक्तीत बसला आहे. तो नेहमी हिंदीतच बोलायचा, परंतु आता तो धडाधड इंग्रजी बोलतो. त्याच्यातील क्षमता आम्ही ओळखू शकलो नाही,'' असे सत्य प्रकाशने सांगितले.