Join us  

विराट कोहली सावध झाला अन् हकालपट्टी होण्याआधीच राजीनामा देऊन मोकळा झाला....

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 12:46 PM

Open in App
ठळक मुद्दे२०१७ची चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९चा वन डे वर्ल्ड कप आणि २०२१ची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल, यात टीम इंडियाला जेतेपद पटकावता आलेले नाही.

मागील आठवड्यात बीसीसीआयनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ जाहीर करताना माजी कर्णधार मेहंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याची मेंटॉर म्हणून नियुक्ती केली. आठवडाभरानंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे जाहीर केले. 'प्रचंड वर्कलोड' मुळे हा निर्णय घेत असल्याचे विराटनं जाहीर केलं असलं तरी त्याच्या निर्णयामागे अनेक कारणं आहेत. आयसीसी स्पर्धांमधील अपयश अन् दुसरीकडे रोहित शर्माचे आयपीएलमधील यश, यामुळे विराटवरील दडपण वाढत होते. त्यात आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी मेंटॉर म्हणून झालेली धोनीची निवड, यानं विराटवरील दडपण अधिक वाढले. त्यामुळेच त्यानं हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बीसीसीआय नाराज, विराट कोहलीला देणार आणखी एक दणका; रोहित शर्माकडे मोठी जबाबदारी सोपवणार

'दैनिक जागरण'नं दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहलीला आयसीसी स्पर्धांमध्ये यश मिळवता आलेले नाही. २०१७ची चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९चा वन डे वर्ल्ड कप आणि २०२१ची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल, यात टीम इंडियाला जेतेपद पटकावता आलेले नाही. बीसीसीआय उघडपणे विराटच्या अपयशावर नाराजी व्यक्त करत नसले, तरी त्यांनी आपापसात याबाबत चर्चा केली होती आणि त्यामुळेच धोनीला मेंटॉर बनवण्याचा निर्णय झाला. या निर्णयानं विराटला दडपणाखाली ढकलले. तसेही जर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यात अपयश आले, तर विराटची गच्छंती अटळ होती आणि हे धोका ओळखून विराटनं विराटनं हा निर्णय घेतला ( A BCCI insider said Virat Kohli knew he would have been removed from white ball captaincy if the team doesn't do well at the UAE World T20. He just reduced a bit of pressure on himself as it would seem that he is there on his own terms)  

कठीण प्रसंग येताच विराट कोहली सोडून द्यायचा साथ; खेळाडूंचाही नव्हता त्याच्यावर विश्वास!

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. २०१३नंतर टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी घरी आणता आलेली नाही. त्यामुळे विराटच्या राजीनाम्यामागे धोनीची निवड हे कारण असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी Republic Media Network ला सांगितले. 

रोहित शर्माला उप कर्णधारपदावरून हटवायचे होते विराट कोहलीला, पण उलटा पडला डाव...

धोनीनं मागच्या वर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.  त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील पहिला व एकमेव कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनीनं ९० कसोटींत ४८७६ धावा केल्या आणि त्यात  ६ शतकं व ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. ३५० वन डेत १०७७३  धावा आणि त्यात १० शतकं व ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. ९८ ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर १६१७ धावा आहेत.

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App