Sachin Tendulkar On Arjun Tendulkar And Saaniya Chandhok Engagement : क्रिकेटच्या मैदानात अधिराज्य गाजवणारा विक्रमादित्य सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतरही आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी प्रयत्नशील दिसतो. याचाच एक भाग म्हणून मास्टर ब्लास्टरनं रेडिटवरील 'आस्क मी एनिथिंग्स' सेशनच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. क्रिकेटच्या मैदानात बाउन्सर अन् यॉर्करचा सामना करणाऱ्या सचिनला यावेळी एका चाहत्याने फिरकी घेणारा प्रश्न विचारला. ज्यावर तेंडुलकरनं कडक स्ट्रेट ड्राइव्ह तसे अगदी थेट उत्तर दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भात सचिन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रिया
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील गप्पा गोष्टींच्या सत्रात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा खरंच साखरपुडा झालाय का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तेंडुलकरनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. "हो, त्याचा साखरपुडा झाला आहे. आम्ही सर्व त्याच्या आयुष्यातील नव्या प्रवासासाठी उत्सुक आहोत, असे उत्तर मास्टर ब्लास्टरनं दिल्याचे पाहायला मिळाले.
धनश्री वर्माला दाटून आलेला हुंदका! ती गोष्ट ऐकून सूर्या दादाची बायको तिच्याबद्दल मनातलं बोलली
अर्जुन तेंडुलकर अन् सानिया चांडोक यांनी गुपचूप उरकला होता साखरपुडा
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी सानिया चांडोल ही (Arjun Tendulkar-Saaniya Chandok) मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. ती तेंडुलकरांची सून होणार ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. सारा तेंडुलकरच्या बांद्रा येथील पीलेट्स स्टुडिओच्या उद्घाटन समारंभाचे फोटो शेअर करतानाही ती तेंडुलकर फॅमिलीसोबत दिसली होती. पण दोघांनी गुपचूप उरकलेल्या साखरपुड्यासंदर्भात दोन्ही कुटुंबियातील कुणीच अधिकृतरित्या माहिती दिली नव्हती. अखेर सचिन तेंडुलकरनं यासंदर्भात मौन सोडले आहे.
तो एक प्रतिभावंत क्रिकेटर, पण....
अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा जलदगती गोलंदाज असून तो फलंदाजीतही धमक दाखवून देण्याची क्षमता असणारा क्रिकेटर आहे. १७ प्रथम श्रेणी सामन्यात त्याच्या खात्यात ३७ विकेट्स जमा आहेत. याशिवाय त्याने ५३२ धावा केल्या आहेत. अर्जुन याने २४ टी २० सामन्यात २७ विकेट्स घेतल्या असून ११९ धावा केल्या आहेत. लिस्ट-ए मधील १८ सामन्याशिवाय आयपीएलमध्ये त्याने ४ सामन्यात ३ विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुन तेंडुलकर हा प्रतिभावंत खेळाडू आहे. पण अवास्तव अपेक्षांच्या ओझ्यामुळे क्षमतेनुसार प्रभाव टाकण्यात कुठंतरी कमी पडल्याचे दिसते. त्यामुळेच त्याच्या मागून येणाऱ्यांनी टीम इंडियात एन्ट्री मारली. पण तो IPL संघातही आपलं स्थान कायम ठेवू शकला नाही.