Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेक शर्माच्या बॅटला स्पिंग लावलीय? न्यूझीलंडच्या खेळाडूंना आला पाँटिंगवाला संशय, हातात घेऊन तपासू लागले...

गुवाहाटी: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्याही टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्याने केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 16:49 IST

Open in App

गुवाहाटी: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्याही टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्याने केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर कीवी खेळाडूंनाही अवाक केले. अभिषेकच्या तुफानी फटकेबाजीनंतर मैदानावर असे काही घडले, ज्याने २००३ च्या विश्वचषक फायनलमधील रिकी पोंटिंगच्या 'स्प्रिंग बॅट'च्या अफवेची आठवण करून दिली.

भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर, डेव्हॉन कॉनवे आणि जेकब डफी हे अभिषेक शर्माची बॅट हातात घेऊन ती तपासाताना आणि हसताना दिसत आहेत. अभिषेकने अवघ्या २० चेंडूत नाबाद ६८ धावा कुटल्या. या खेळीत त्याने केवळ १४ चेंडूत अर्धशतक झळकावले, जे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारतीय फलंदाजाचे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे.

२००३ च्या आठवणी ताज्या अभिषेकची बॅट तपासताना पाहून क्रिकेट चाहत्यांना २००३ च्या आठवणी आल्या. त्यावेळी वर्ल्डकप फायनलमध्ये भारताच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या रिकी पोंटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग असल्याचा दावा अनेक चाहत्यांनी केला होता. आता तशीच काहीशी परिस्थिती गुवाहाटीमध्ये पाहायला मिळाली.

या सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. न्यूझीलंडने दिलेले १५४ धावांचे लक्ष्य भारताने केवळ १० षटकांत पूर्ण केले. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही नाबाद ५७ धावांची खेळी केली. या विजयासोबतच भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अभिषेक शर्मा सध्या तुफान फॉर्ममध्ये असून त्याच्या १९५.२२ च्या स्ट्राईक रेटने प्रतिस्पर्धी संघात धडकी भरवली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Abhishek Sharma's Bat Under Scrutiny: New Zealand Players Suspect 'Spring'?

Web Summary : Abhishek Sharma's explosive batting in the T20 match sparked suspicion among New Zealand players, reminiscent of the Ricky Ponting 'spring bat' controversy. They examined his bat post-match after his unbeaten 68 off 20 balls helped India secure a dominant series lead.
टॅग्स :अभिषेक शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंड