IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने १९७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर राजस्थान रॉयल्ससाठी विषयच संपला होता... त्यात अर्शदीप सिंगने सुरुवातील धक्के दिले अन् नॅथन एलिसने ४ विकेट्स घेत RR चे कंबरडे मोडले होते... अशा परिस्थिती राजस्थानचे PBKS समोर उभे राहणेही अवघड होते, परंतु शिमरोन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी २६ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली अन् मॅचमध्ये रंगत आणली. अखेरच्या षटकात हेटमायर बाद झाला आणि इम्पॅक्ट खेळाडू म्हणूल आलेल्या ध्रुवच्या खांद्यावर सर्व जबाबदारी आली. त्याने अखेरच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केला, परंतु ५ धावांनी RR चा विजय निसटला. राजस्थान रॉयल्सने २० लाखांत जुरेलला आपल्या ताफ्यात कायम घेतले आणि यष्टीरक्षक-फलंदाजाने त्याच्या किमतीपेक्षा सरस खेळ केला.
कोण आहे ध्रुव जुरेल?आग्राच्या ध्रुव जुरेलला युवा आशिया चषक स्पर्धेतील अंडर-१९ क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय मालिकेत आग्राच्या खेळाडूला कर्णधारपदाची जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. १ जानेवारी २००१ रोजी जन्मलेल्या ध्रुवचंद जुरेल याने आग्रा येथील स्प्रिंगल क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटच्या बारकावे शिकले. मुसळधार पाऊस आणि वादळातही मैदानात सराव करण्याची त्याची आवड त्याला इथपर्यंत घेऊन आली आहे. कर्णधार बनल्याची माहिती मिळाल्यावर त्याने इंग्लंडमधून वडील नेमी चंद्र जुरेल यांना पहिला फोन केला होता आणि फोनवर बोलताना ध्रुव खूप भावूक झाला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"