Dhruv Jurel Smashes Maiden List A Hundred During UP vs Baroda VHT 2025 : भारतीय विकेटकीपर-बॅटर ध्रुव जुरेल याने राजकोटच्या मैदानात तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत लिस्ट ए क्रिकेटमधील पहिले वहिले शतक झळकावले आहे. उत्तर प्रदेशच्या संघाकडून मैदानात उतरलेल्या ध्रुव जुरेल याने क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या खेळीदरम्यान त्याने १५ चौकार आणि ८ षटकार मारले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
७८ चेंडूत साजरे केले शतक अन्...
ध्रुव जुरेल याने ७८ चेंडूत आपले लिस्ट ए क्रिकेटमधील पहिले शतक साजरे केले. त्याने शतकी खेळी दीडशतकात रुपांतरीत केली. १०१ चेंडूचा सामना करून तो १०१ चेंडूचा सामना करून १६० धावांवरनाबाद राहिला. त्याच्या या खेळीच्या जोरावर उत्तर प्रदेशच्या संघाने निर्धारित ५० षटकांत ७ विकेट्सच्या बदल्यात ३६९ धावा करत बडोद्यासमोर ३७० धावांचे तगडे आव्हान ठेवले.
Flashback 2025: स्मृती मानधनाची कमाल! स्वत:चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
कर्णधार रिंकूसह प्रशांत वीरसोबत शतकी भागीदारी
उत्तर प्रदेशच्या संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ध्रुव जुरेल याने प्रत्येक गोलंदाजाला बॅकफूटवर ढकलले. UP चा कर्णधार रिंकू सिंह याच्या साथीनं त्याने चौथ्या विकेटसाठी १२० चेंडूत १३१ धावांची भागीदारी रचली. याशिवाय IPL मधील सर्वात महागडा अनकॅप्ड प्लेयर ठरलेल्या प्रशांत वीरच्या साथीनं त्याने ५२ चेंडूत १२२ धावांची भागीदारी रचल्याचे पाहयला मिळाले.
रिंकूसह आणि प्रशांतवीरचीही कडक बॅटिंग
याआधीच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रिंकू सिह याने सलग दुसऱ्या सामन्यात फिफ्टी प्लसचा डाव साधला. जुरेलसोबत संघाचा डाव भक्कम करताना त्याने ६७ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. प्रशांत वीरयाने २३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३५ धावांचे योगदान दिले.
विकेट किपर बॅटरच्या रुपात टीम इंडियासाठी सर्वोत्तम पर्याय
ध्रुव जुरेल याने २०२४ मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेतून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याच वर्षी इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत त्याला टीम इंडियात संधी मिळाली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या घरच्या मैदानातील कसोटी मालिकेत त्याने शतकी खेळीही केली होती. आता तो व्हाईट बॉल क्रिकेटमध्येही पंतचा सर्वोत्तम पर्याय बनून पुढे येत आहे.