#DhoniRetires हॅशटॅगचा सोशल मीडियावर ट्रेंड; चाहत्यांच्या मनात धाकधूक

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 01:27 PM2019-10-29T13:27:30+5:302019-10-29T13:27:54+5:30

whatsapp join usJoin us
#DhoniRetires hashtag trends on social media; MS Dhoni to retire? worries fans | #DhoniRetires हॅशटॅगचा सोशल मीडियावर ट्रेंड; चाहत्यांच्या मनात धाकधूक

#DhoniRetires हॅशटॅगचा सोशल मीडियावर ट्रेंड; चाहत्यांच्या मनात धाकधूक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्याविरुद्धच्या मालिकेत धोनी टीम इंडियात दिसला नाही. त्यात आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड समिती युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देत आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा वारंवार सुरुच आहेत. मंगळवारी ट्विटरवर #DhoniRetires हा हॅशटॅग वाऱ्यासारखा व्हायरल होत होता आणि त्यामुळे चाहत्यांच्या मनात धाकधूक लागली होती.

#DhoniRetires हा हॅशटॅग ट्रेंड होताच चाहत्यांनी धोनीनं देशासाठी दिलेल्या योगदानाचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. कॅप्टन कूल धोनी आज निवृत्ती जाहीर करतोय की काय, अशी भीती सर्वांना वाटू लागली. काही चाहत्यांनी तर मग #NeverRetireDhoni आणि #ThankYouDhoni असे हॅशटॅग व्हायरल केले. 

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर भडकले रवी शास्त्री, म्हणाले एकदाचा संपवा तो विषय
''15 वर्ष देशासाठी क्रिकेट खेळणाऱ्या धोनीला कधी निवृत्ती घ्यायची याची जाण आहे,'' असे शास्त्री म्हणाले. भारतीय क्रिकेटसाठी धोनीनं दिलेलं योगदान एवढं आहे की, निवृत्तीचा निर्णयाचा अधिकार त्याला स्वतःला आहे. धोनीच्या बाबतित शास्त्रींचं मत हे निवड समितीच्या मताशी विसंगत आहे. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी  सांगितले की, " विश्वचषकानंतर आमचे विचार स्पष्ट झाले आहेत. आम्ही युवा यष्टीरक्षकांना जास्त संधी देणार आहोत. धोनीच्या मनातही हीच गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही धोनीऐवजी युवा यष्टीरक्षकांना यापुढे पसंती देणार आहोत."

पण, शास्त्री म्हणातात की,''15 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर केव्हा काय करायचे याची जाण धोनीला नसेल का? जेव्हा त्यानं कसोटीतून निवृत्ती घेतली होती, तेव्हा त्यानं काय सांगितलं होतं? हेच की वृद्धीमान साहाकडे जबाबदारी सोपवण्याची हीच योग्य वेळ आहे. जेव्हा संघाच्या हिताची गोष्ट असते तेव्हा धोनी नेहमी आपले विचार व कल्पना घेऊन तत्पर असतो. रांची कसोटीतही ते पाहायला मिळाले. कधी निवृत्त व्हायचे याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार धोनीकडे आहे. आता त्यावर जास्त चर्चा करू नका.''

Video : टीम इंडियात पुनरागमनासाठी महेंद्रसिंग धोनी घेतोय मेहनत, जिममध्ये गाळतोय घाम

 

Web Title: #DhoniRetires hashtag trends on social media; MS Dhoni to retire? worries fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.