Join us
Daily Top 2Weekly Top 5

धोनी पुन्हा झाला 'यंग'... नवा लुक पाहून चाहते म्हणतील 'कूsssल'!

इंग्लंडविरूद्धच्या टी-20 आणि वन डे मालिकेत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरी इतकीच त्याची सफेद दाढी अधिक चर्चिली गेली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 12:06 IST

Open in App

लंडन - इंग्लंडविरूद्धच्या टी-20 आणि वन डे मालिकेत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरी इतकीच त्याची सफेद दाढी अधिक चर्चिली गेली. भारताने टी-20 मालिका जिंकली, परंतु वन डे मालिकेत त्यांना पराभव पत्करावा लागला. आता हे उभय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकमेकांसमोर येणार आहेत. पाच सामन्यांची ही मालिका 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे. मात्र, धोनीचा या मालिकेत समावेश नसणार आहे. 2014 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे धोनी मायदेशी परतला आहे. यावेळी धोनीचा यंग अँड डॅशिंग लुक पाहायला मिळाला. त्याच्या चेह-यावर सफेद दाढी नव्हती आणि केसही वाढलेले नव्हते. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने ट्विट केलेल्या फोटोत पुन्हा यंग धोनी पाहायला मिळाला. इंग्लंडविरूद्धच्या मागील दोन सामन्यांत धोनीला अपेक्षेइतका चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याच्या संथ खेळीवर प्रचंड टीका झाली. दुस-या वन डेत धोनीने 59 चेंडूंत 37 धावा केल्या, तर अखेरच्या लढतीत त्याने 66 चेंडूंत 42 धावा केल्या. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी