Join us

धोनी होता ' माही 'र; पण कोहली ठरतोय अपयशी... हे तुम्हाला माहिती आहे का

एक कर्णधार म्हणून मात्र कोहली अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्त्वाची तुलना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबरोबर केली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 13:53 IST

Open in App
ठळक मुद्दे... त्यामुळेच ' डीआरएस 'ला धोनी रीव्ह्यू सिस्टीमही म्हटले जात होते.

मुंबई : एक फलंदाज म्हणून विराट कोहली हा सध्याच्या घडीला यशाच्या शिखरावर आहे, पण एक कर्णधार म्हणून मात्र कोहली अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्त्वाची तुलना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबरोबर केली जात आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींध्येही कोहली अपयशी ठरताना दिसत आहेत. कोहलीहा ' डीआरएस 'मध्येही नापास ठरताना दिसत आहे. 

धोनी जेव्हा कर्णधार होता तेव्हा तो ' डीआरएस 'चा वापर करण्यात निष्णात होता. त्यामुळेच ' डीआरएस 'ला धोनी रीव्ह्यू सिस्टीमही म्हटले जात होते. पण कोहलीला मात्र ' डीआरएस 'चा योग्य वापर आतापर्यंत करता आलेला दिसत नाही. आतापर्यंत ' डीआरएस ' वापरण्यात त्याने बहुतेक वेळा चुका केल्या आहेत. ' डीआरएस ' घेण्यापूर्वी त्याने आतापर्यंत यष्टीरक्षकाला विचारलेले नाही आणि हीच त्याची घोडचूक ठरताना दिसत आहे. 

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंह धोनीक्रिकेट