Join us

धोनीने केला पहिल्या प्रेमाचा खुलासा, पण म्हणाला बायकोला सांगू नका

चेन्नई संघाच्या एका कार्यक्रमामध्ये धोनीने आपल्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 09:23 IST

Open in App

मुंबई - महेंद्रसिंग धोनीच्या जीवनातील पहिले प्रेम त्याची पत्नी साक्षी नव्हे, तर दुसरी एक मुलगी होती. धोनीच्या आयुष्यावर चित्रपट आला त्यावेळी साक्षीआधी प्रियांका नावाच्या तरुणीसोबत प्रेम करत होता असे दाखवण्यात आले होते. पण धोनीचे हे पहिले प्रेम नव्हे. चेन्नई संघाच्या एका कार्यक्रमामध्ये धोनीने आपल्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे.

1999 मध्ये माजी कर्णधार एम. एस धोनी बारावीमध्ये शिकत होता. त्यावेळी तो स्वाती नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. हा खुलासा धोनीने स्वत: च केला आहे. आपल्या पहिल्या प्रेयसीचे नाव सांगताना तो मिश्किल माझ्या पत्नीला सांगू नका असे म्हणाला. त्यावेळी त्या कार्यक्रमात एकच हशा पिकला. 

एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटामध्ये धोनीच्या पहिल्या प्रेम प्रियांका असल्याचे दाखवण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू बनण्याच्या आधी धोनीचे त्या मुलीवर जिवापाड प्रेम होते.अशी सीक्रेट लव्ह स्टोरी उलगडण्यात आली होती. 

टॅग्स :आयपीएल 2018एम. एस. धोनी