Join us

जबरदस्त सुरुवात केल्यानंतर भारतीय संघाची पिछेहाट, अर्धा संघ तंबूत

खेळाडूंच्या दुखापती आणि आजाराने ग्रासलेल्या श्रीलंका संघाला सलग चौथ्या वन-डेत एकतर्फी धूळ चारण्याची संधी भारताकडे आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 17:19 IST

Open in App

कोलंबो, दि. 31 -  खेळाडूंच्या दुखापती आणि आजाराने ग्रासलेल्या श्रीलंका संघाला सलग चौथ्या वन-डेत एकतर्फी धूळ चारण्याची संधी भारताकडे आहे. महेंद्रसिंह धोनीचा हा ३०० वा सामना असल्याने अविस्मरणीय खेळीसह त्याने सामना जिंकून द्यावा, अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीचे तिन्ही सामने एकतर्फी झाले असल्याने भारताचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. शिखर धवन स्वस्तात बाद झाला असल्याने भारताला पहिलाच फटका बसला. सहा धावांवर भारताने पहिली विकेट गमावली. त्यानंतर विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत फक्त 76 चेंडूत शतक पुर्ण केलं. 131 धावांवर तो आऊट झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा भारतीय संघाची जबरदस्त सुरुवात कायम ठेवण्यात अपयशी राहिले. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, के एल राहुल आऊट झाले आहेत.

लंकेकडून अकिला धनंजया याचा अपवाद वगळता लंकेचा एकही गोलंदाज भारतीय फलंदाजांवर दडपण आणू शकला नाही. भारतीय संघात तीन बदल करण्यात आले असून शार्दूल ठाकूर, मनिष पांडे आणि कुलदीप यादव यांना संधी देण्यात आली आहे. केदार जाधव, यजुवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती देण्यात आली आहे.

दुसरीकडे लंकेला सर्वोत्कृष्ट ११ खेळाडू निवडणे कठीण झाले आहे. सनथ जयसूर्याच्या नेतृत्वाखालील निवड समितीने राजीनामा दिला असून, तो स्वीकारण्यात आला आहे. दिनेश चंडीमलच्या अंगठ्याला मागच्या सामन्यात दुखापत झाली. काळजीवाहू कर्णधार चमारा कापुगेदरा हा पाठदुखीमुळे त्रस्त असल्याने, उर्वरित दोन सामन्यांसाठी लसिथ मलिंगा कर्णधारपद सांभाळणार आहे.

धोनी@ ३००! पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका काबीज करीत भारतीय संघाने श्रीलंका दौºयाची मोहीम फत्ते केली. आता चौथ्या सामन्यात सर्वांच्या नजरा असतील त्या माहीवर. हा सामना केवळ औपचारिक असला तरी तो महेंद्रसिंह धोनीसाठी खास असेल; कारण धोनीच्या एकदिवसीय कारकिर्दीतील तो ३०० वा वनडे आहे. तो गेल्या १३ वर्षांपासून खेळत आहे. भारताकडून ३०० वनडे खेळणारा माही हा देशाचा सहावा खेळाडू आहे. या यादीत सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. सचिनने सर्वाधिक ४६३ सामने खेळले आहेत. 

टॅग्स :क्रिकेटविराट कोहली