Join us
Daily Top 2Weekly Top 5

खेळ मांडला, धोनी, रैना आणि हरभजनच्या मुलींचा ‘रिंगा रिंगा रोजेस’ व्हायरल!

या तिघींची सध्या चांगलीच मैत्री जमली असून ‘रिंगा रिंगा रोजेस..’ खेळतानाचा हा व्हिडिओ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 17:28 IST

Open in App

मुंबई: सध्या आयपीएल स्पर्धा सुरू असल्यामुळे क्रिकेटपटुंचे विविध किस्से ऐकायला मिळत आहेत. यामध्ये कॅप्टन कूल धोनीची लाडकी लेक झिवा हिची बरीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या संघाचा सामना सुरु असताना 'बाबांना आत्ता इथे बोलवा' असा लाडिक आग्रह धरणाऱ्या झिवाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता धोनी, हरभजन सिंग आणि सुरेश रैनाच्या लेकी एकत्र खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. सुरेश रैनाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला असून यामध्ये धोनीची मुलगी झिवा, रैनाची मुलगी ग्रेसिया आणि हरभजनची मुलगी हिनाया खेळताना पाहायला मिळत आहेत. या तिघींची सध्या चांगलीच मैत्री जमली असून ‘रिंगा रिंगा रोजेस..’ खेळतानाचा हा व्हिडिओ आहे. CSKच्या या चिमुकल्या BFF सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. झिवा आणि ग्रेसियामधील मैत्री याआधीही बऱ्याचदा पाहायला मिळाली. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असणाऱ्या रैनाने याआधीही झिवा आणि ग्रेसियाच्या खेळतानाचे, गप्पा मारतानाचे बरेच फोटो शेअर केले आहेत.

टॅग्स :आयपीएल 2018महेंद्रसिंह धोनी