Join us

धोनीने म्हटले होते दडपण घ्यायचे नाही : जोगेंद्र शर्मा

शर्मा म्हणाले, ‘पाकिस्तानविरुद्धच्या त्या लढतीत मिस्बाहला बाज करीत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविल्यामुळे मी खूश आहे. त्यावेळी अखेरचे दोन चेंडू शिल्लक होते. ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 02:38 IST

Open in App

विश्वकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानदरम्यान खेळल्या गेलेल्या टी-२० अंतिम सामन्यात अखेरच्या षटकासाठी माझ्याकडे चेंडू सोपविताना कर्णधार धोनीने म्हटले होते की दडपण घ्यायचे नाही, असे मत व्यक्त केले माजी क्रिकेटपटू जोगेंद्र शर्मा यांनी. जोगेंद्र शर्मा सध्या हरियाणा पोलीसमध्ये डीएसपी पदावर कार्यरत आहे. शर्मा म्हणाले, ‘पाकिस्तानविरुद्धच्या त्या लढतीत मिस्बाहला बाज करीत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविल्यामुळे मी खूश आहे. त्यावेळी अखेरचे दोन चेंडू शिल्लक होते. ’भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने निवृत्ती स्वीकारल्याच्या निर्णयानंतर शर्मा यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले,‘हा धोनीचा स्वत:चा निर्णय आहे. एक वेळ अशी येते की तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. त्यांच्यासोबत खेळण्याचा माझा अनुभव चांगला राहिला. धोनीसोबत भारतीय संघाव्यतिरिक्त आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वत:ला नशिबवान समजतो.’