Join us

' फन टाइम विथ फॅमिली ' कुटुंबियांबरोबर सुट्टीचा आनंद लुटतोय धोनी

धोनी त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिव्हा हे एका ठिकाणी सुट्टीमध्ये वेळ व्यतित करण्यासाठी गेले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 18:29 IST

Open in App
ठळक मुद्देधोनी आपल्या या सुट्टीमध्ये कुटुंबियांबरोबर आनंद लुटताना दिसत आहे.

नवी दिल्ली : सध्या श्रीलंकेत निदाहास ट्रॉफी सुरु आहे. भारतीय संघ बुधवारी बांगलादेशचा सामना करणार आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यासाठी सराव करत आहे. पण या मालिकेसाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली आहे आणि धोनी आपल्या या सुट्टीमध्ये कुटुंबियांबरोबर आनंद लुटताना दिसत आहे.

धोनीसह कर्णधार विराट कोहलीलाही या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रविवारी कोहलीने आपण पत्नी अनुष्काबरोबर सुट्टीचा आनंद लुटत असल्याचे फोटो टाकले होते. धोनीही सध्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटत आहे. धोनी त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिव्हा हे एका ठिकाणी सुट्टीमध्ये वेळ व्यतित करण्यासाठी गेले आहेत. या तिघांबरोबर काही श्वानही धोनी आपल्याबरोबर घेऊन गेला आहे. त्याने इंस्टाग्रामवर टाकलेल्या व्हीडीओमध्ये धोनी काही श्वानांबरोबर खेळत असल्याचेही दिसत आहे.

काही दिवसांनी आयपीएलच्या अकराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. हा हंगाम जवळपास दीड महिना चालणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये धोनीला कुटुंबियांना वेळ द्यायला जमणार नाही. त्यामुळे धोनीने श्रीलंकेतील मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे पुनरागमन होत आहे. या संघाचे कर्णधारपद धोनीकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीनिदाहास ट्रॉफी २०१८