Join us

धोनी आणि गिलख्रिस्ट यांना डी' कॉकने मागे सारत रचला विक्रम

श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर 199 धावांनी विजय मिळवला आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात टाकली. या सामन्यामध्ये डी' कॉकने नवीन विक्रम रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 16:19 IST

Open in App
ठळक मुद्देदक्षिण आफ्रिकेचा युवा यष्टीरक्षक क्विंटन डी' कॉक याने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

कोलंबो : दक्षिण आफ्रिकेचा युवा यष्टीरक्षक क्विंटन डी' कॉक याने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. हा विक्रम रचताना डी' कॉकने अॅडम गिलख्रिस्ट आणि महेंद्रसिंग धोनी यांनाही मागे सारले आहे.

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यामधील दुसरा कसोटी सामना आज संपला. श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर 199 धावांनी विजय मिळवला आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात टाकली. या सामन्यामध्ये डी' कॉकने नवीन विक्रम रचला आहे.

आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये जलद 150 बळी पटकावण्याचा मान डी' कॉकने पटकावला आहे. यापूर्वी हा विक्रम गिलख्रिस्टच्या नावावर होता, त्याने 36 सामन्यांमध्ये 150 बळी मिळवले होते. डी' कॉकने  दीडशे बळींचा टप्पा 35 सामन्यांमध्ये ओलांडला आहे. दीडशे बळींचा टप्पा ओलांडण्यासाठी धोनीला 48 कसोटी सामने वाट पाहावी लागली होती.

टॅग्स :क्विन्टन डि कॉकक्रिकेटद. आफ्रिकाश्रीलंका