Join us

Asia Cup 2018 : धोनीलाही कधी कधी 'त्या' गोष्टीची 'हुक्की' यायची

धोनीलाही कधीकधी 'त्या' गोष्टीची 'हुक्की' यायची, अशी धक्कादायक एका क्रिकेटपटूने समोर आणली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 09:41 IST

Open in App
ठळक मुद्देचेन्नईच्या संघात ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू जॉर्ज बेलीही आहे. या बेलीनेच धोनीची ही एक बाब उघड केली आहे.

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार राहीला आहे. भारताला त्याने दोन विश्वचषक आणि चॅम्पियन्स करंडकही जिंकवून दिला आहे. काही दिवसांपूर्वी धोनीने दोनशेव्या सामन्यात भारताचे नेतृत्त्वही केले होते. पण त्याच्याबद्दल एक खळबळजनक गोष्ट पुढे आली आहे. धोनीलाही कधीकधी 'त्या' गोष्टीची 'हुक्की' यायची, अशी धक्कादायक एका क्रिकेटपटूने समोर आणली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे धोनीकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. कर्णधार म्हणून धोनीचा हा दोनशेवा सामना होता. 696 दिवसांनंतर धोनीला पुन्हा एकदा कर्णधार म्हणून पाहण्याचा योग चाहत्यांना आला होता.

धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाचाही कर्णधार आहे. चेन्नईच्या संघात ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू जॉर्ज बेलीही आहे. या बेलीनेच धोनीची ही एक बाब उघड केली आहे. पण या गोष्टी विश्वास ठेवायचा की नाही, याचा विचार चाहते करत आहेत.

बेलीने धोनीविषयी सांगितले की, " धोनीला हुक्का ओढायला फार आवडते. काही वेळा त्याला हुक्का ओढायची हुक्की यायची. काही वेळा तर तो आपल्या हॉटेलच्या रुमममध्येही हुक्का ओढायचा. " 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीचेन्नई सुपर किंग्स