Join us  

मोहम्मद सिराजला वडिलांच्या कबरीजवळ पाहून भावुक झाले धर्मेंद्र; त्याचं ट्विट वाचून पाणावतील डोळे!

या दौऱ्यावर कसोटी संघात पदार्पण करून इतिहास घडवणारा सिराज मायदेशात परताच एअरपोर्टवरून थेट दफनभूमीत पोहोचला आणि तेथे त्यानं वडिलांच्या कबरीवर पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली.

By स्वदेश घाणेकर | Published: January 23, 2021 11:27 AM

Open in App

भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. ०-१ अशा पिछाडीवरून टीम इंडियानं चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. टीम इंडियाच्या या विजयाचा आनंद जगभरात साजरा केला गेला. अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांचे फ्रंट पेज ही टीम इंडियाच्या फोटोंनी व विजयाच्या बातम्यांनी भरले होते. नेते, अभिनेते, आजी-माजी खेळाडूंनीही टीम इंडियाच्या शिलेदारांचे कौतुक केलं. पण, दिग्गज अभिनेता धमेंद्र ( Dharmendra) यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी हे ट्विट भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) याच्यासाठी लिहिलं होतं. सिराजच्या समर्पित वृत्तीनं धमेंद्र यांना भावुक केलं. 

या दौऱ्यावर कसोटी संघात पदार्पण करून इतिहास घडवणारा सिराज मायदेशात परताच एअरपोर्टवरून थेट दफनभूमीत पोहोचला आणि तेथे त्यानं वडिलांच्या कबरीवर पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. सिराजचे वडील मोहम्मद गौस ( Mohammed Ghouse) यांचे २० नोव्हेंबरला निधन झाले. त्याच्या एक आठवड्याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचला होता आणि कोरोना नियमांमुळे सिराजला वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी मायदेशात परतता आले नाही.  सिराजचा हा फोटो पाहून धमेंद्र भावुक झाले. त्यांनी लिहिले की,''भारताच्या वीर मुला तुझा अभिमान वाटतो. वडिलांच्या निधनाचे दुःख हृदयात ठेवून तू भारतासाठी मॅच खेळलास आणि एक अविश्वसनीय विजय देशाला मिळवून दिला. काल तुला तुझ्या वडिलांच्या कबरीजवळ पाहून मन सून्न झालं. त्यांना स्वर्गात जागा मिळेल.''   इशान शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर गेले असतानाही सिराजनं दोन कसोटींच्या अनुभवावर गॅबा कसोटीत भारतीय गोलंदाजांचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळले. गॅबा कसोटीत पाच विकेट्स घेऊन सिराजनं अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत त्यानं भारताकडून सर्वाधिक १३ विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :मोहम्मद सिराजधमेंद्र