Devkinandan Thakur on IPL: इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये बांगलादेशी क्रिकेटपटूला घेण्यावरुन वाद अधिक तीव्र होताना दिसत आहे. प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया देत IPL मध्ये बांगलादेशी खेळाडूंना संधी देऊ नये, अशी मागणी BCCI कडे केली आहे. हिंदूंच्या भावना वारंवार दुर्लक्षित केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
कोणताही बांगलादेशी खेळाडू IPL मध्ये नको
देवकीनंदन ठाकूर यांनी म्हणाले, आम्ही आधीच सांगितले होते की, बांगलादेशचा एकही क्रिकेटपटू IPL मध्ये येऊ नये. आम्ही माहिती घेतली तेव्हा समजले की, केवळ एकच बांगलादेशी क्रिकेटपटू IPL मध्ये खरेदी करण्यात आला आहे. यावरूनच आपली नाराजी असल्याचे स्पष्ट केले.
KKR व्यवस्थापनाला थेट इशारा
ठाकूर यांनी थेट Kolkata Knight Riders (KKR) चे नाव घेत कडक शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, जर तुम्हाला हिंदूंवर प्रेम असेल, भारतावर प्रेम असेल आणि हिंदूंच्या मृत्यूचे दुःख वाटत असेल, तर KKR ने त्या बांगलादेशी खेळाडूला तात्काळ संघातून काढून टाकावे. जर तसे झाले नाही, तर KKR चा बहिष्कार करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
9 कोटी 20 लाखांची खरेदी; पैशांवर प्रश्नचिन्ह
ठाकूर यांनी खेळाडूच्या किंमतीचाही उल्लेख केला. तो बांगलादेशी खेळाडू 9 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी करण्यात आला आहे. हा पैसा कुठे जाणार? त्याचा उपयोग कशासाठी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. KKR ने खेळाडूची नोंदणी रद्द केली नाही, तर हा मोठा डाव ठरेल, असा आरोपही त्यांनी केला. वेळीच निर्णय घेतला नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि नंतर कोणीही वाचवू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.