ठळक मुद्देजे भारताच्या एकही फलंदाजाला जमले नाही ते बिशूने करून दाखवले आहे.
राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : आतापर्यंत ज्या फलंदाजांनी शतके झळकावली आहे त्यांनी बॅटच्या सहाय्याने पराक्रम केले आहेत. पण सध्या भारताविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात मात्र वेस्ट इंडिजचा खेळाडू देवेंद्र बिशूने बॅट हातात न घेत चक्क द्विशतक पूर्ण केले आहे.
भारताकडून पृथ्वी शॉ, विराट कोहली यांनी शतके झळकावली, तर रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांची शतके मात्र हुकली. पण जे भारताच्या एकही फलंदाजाला जमले नाही ते बिशूने करून दाखवले आहे.
भारताविरुद्ध गोलंदाजी करताना बिशूने भारताच्या चार फलंदाजांना बाद केले. पण या चार फलंदाजांना बाद करताना मात्र बिशूला दोनशेपेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. बिशूने वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक ५४ षटके टाकली. या ५४ षटकांमध्ये त्याने तब्बल २१७ धावा दिल्या.