Join us

IPL 2020: युवीने दिलेल्या चॅलेंजला देवदत्त पडिक्कलने दिले उत्तर

युवीने दिलेल्या या चॅलेंजला पडिक्कलने उत्तरही दिले असून याचीच चर्चा सध्या नेटिझन्समध्ये सुरु आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 16:43 IST

Open in App

मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर छाप पाडली. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल (Devdatt Padikkal) आघाडीवर आहे. त्याने चार सामन्यांतून तीन सामन्यांत अर्धशतक ठोकून सर्वांनाच प्रभावित केले. त्याची खेळी पाहून भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगही (Yuvraj Singh) खूप प्रभावित झाला आणि त्याने थेट पडिक्कलला एक चॅलेंजही दिले. युवीने दिलेल्या या चॅलेंजला पडिक्कलने उत्तरही दिले असून याचीच चर्चा सध्या नेटिझन्समध्ये सुरु आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या झालेल्या लढतीत पडिक्कलने कर्णधार विराट कोहलीसह आक्रमक अर्धशतक झळकावताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. यानंतर युवीने पडिक्कलच्या खेळीवरुन एक ट्वीट केले होते. यावेळी युवीने कोहलीच्या खेळीचेही कौतुक केले. त्याने ट्वीट केले की, ‘फॉर्म काही काळापुरताच असतो, पण दर्जा नेहमीच राहतो. विराट कोहलीला मी गेल्या आठ वर्षापासून कधीही खराब फॉर्ममध्ये पाहिलेले नाही. हे अद्भुत आहे. पडिक्कल खरंच खूप चांगली फलंदाजी करत आहे. त्याच्यासोबत फलंदाजी करुन पहावे लागेल की, कोण सर्वात जास्त मोठे फटके मारु शकतो.’

यावर आता पडिक्कलनेही ट्वीट करुन युवीला मस्त उत्तर दिले आहे. पडिक्कल म्हणाला की, ‘तुमच्याशी स्पर्धा करत नाहीए पाजी... तुमच्याकडून फ्लिक शिकलो.. नेहमीच तुमच्यासोबत फलंदाजी करण्याची इच्छा आहे.. चला!’ 

टॅग्स :IPL 2020युवराज सिंग