Join us  

भारत हा मॅच फिक्सिंगचा गुप्त अड्डा; पाकिस्तानी क्रिकेटपटू बरळला

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मॅच फिक्सिंग प्रकरणावर दावे करत सुटले आहेत. पाकिस्तानचा माजी खेळाडू आमीर सोहेलनं माजी ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 3:48 PM

Open in App

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मॅच फिक्सिंग प्रकरणावर दावे करत सुटले आहेत. पाकिस्तानचा माजी खेळाडू आमीर सोहेलनं माजी कर्णधार वसीम अक्रमवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले आहेत. त्यात आता मॅच फिक्सिंगचं मुळ भारतात असल्याचा दावा, पाकिस्तानचा माजी गोलंदाज अकीब जावेदनं केला आहे. 1990च्या भ्रष्टाचार प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या खेळाडूंमध्ये जावेदचं नाव आहे. त्यानं एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आता भारत हा मॅच फिक्सिंगचा गुप्त अड्डा असल्याचं सांगितलं. शिवाय त्यानं इंडियन प्रीमिअर लीगवरही ( आयपीएल) प्रश्न उपस्थित केले. 

'टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया दौरा करण्यापेक्षा पाकिस्तानात जावं अन् कसोटी मालिका खेळावी'

Geo TVशी बोलताना जावेद म्हणाला,''मी फिक्सिंगविरोधात आवाज उठवला, म्हणून माझी कारकीर्द लवकर संपुष्टात आली. त्यामुळेच मी कधी पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक बनू शकलो नाही.'' यावेळी जावेदनं पाकिस्तान क्रिकेट मंडळावर टीका केली. मंडळानं मोहम्मद आमीरला पुन्हा खेळण्याची संधी देऊन मॅच फिक्सिंग करणाऱ्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यानं केला. 

''मॅच फिक्सिंगचं मुळ खूप खोल आहे आणि एकदा का तुम्ही त्यात अडकलात, तर तुम्ही बाहेर पडू शकत नाही. अनेक क्रिकेटपटूंना शिक्षा झाली, पंरतु यामागील माफिया समोर आलेला नाही. दोघांनाही शिक्षा व्हायला हवी. या माफियाचं गुप्त अड्डा भारतात आहे. पाकिस्तानमध्येही असे अड्डे आहेत,''असे जावेद म्हणाला.  1992च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा जावेद सदस्य होता.  

 

दरम्यान पाकिस्तानचा माजी गोलंदाज सर्फराज नवाजच्या आरोपांनंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार आमिर सोहेलनं दिग्गज गोलंदाजावर गंभीर आरोप केले होते. एका स्थानिक टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सोहेलनं गंभीर आरोप केले. 1992नंतर पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकू न देणे, याची काळजी अक्रमनं घेतली, असा आरोप सोहेलनं केला होता. सोहेल म्हणाला,''1996च्या वर्ल्ड कप पूर्वी एक वर्ष म्हणजेच 1995मध्ये रमीझ राजा संघाचे कर्णधार होते. त्यापूर्वी सलीम मलिक यांनी ही जबाबदारी पार पाडली. हे यशस्वी ठरले होते आणि त्यांना एक वर्ष अजून संधी दिली असती, तर अक्रमला वर्ल्ड कप मध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली नसती.'' 

Mohammed Shamiचं नाव का बदनाम करतेस? हसीन जहाँच्या नव्या व्हिडीओवर नेटिझन्स संतापले  

रोहित शर्मानं दिली Good News; मोठ्या आनंदात केलं नव्या पाहुण्याचं स्वागत

Sachin Tendulkarसाठी कन्येनं बनवली स्पेशल डिश; 60 सेकंदात फस्त 

...जणू काही मूल झाल्याशिवाय स्त्रीच्या जन्माचं सार्थकच होत नाही; Sania Mirza ची '(वु)मन की बात'

Video : ऐ खुदा, तुने तो हमे हैरान कर दिया!; Harbhajan Singhची कविता व्हायरल

खुशखबर: नव्या नियमांसह मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणार क्रिकेटपटूंचा सराव

 

टॅग्स :मॅच फिक्सिंगपाकिस्तानभारत