Delhi Capitals vs Gujarat Titans IPL 2026 : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलमधील १४ वा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिल, जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद २१० धावा करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघासमोर विक्रमी २११ धावांचे टार्गेट सेट केले आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने एवढ्या धावांचा यशस्वी पाठलाग केलेला नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! बटलरचं दमदार अर्धशतक
पहिल्यांदा फलंदाजी करताना साई सुदर्शनच्या रुपात गुजरात टायटन्सच्या संघाने १९ धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर जोस बटलर आणि शुभमन गिल जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूत ६० धावांची दमदार भागीदारी रचली. जोस बटलरने २७ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची दमदार खेळी साकारली.
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
मग गिल-वॉशिंग्टन सुंदर जोडी जमली
बटलर आपलं काम करून गेल्यावर गिल-वॉशिंग्टन जोडी जमली. कर्णधार शुभमन गिलनं ४५ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७० धावांची खेळी केल्यावर वॉशिंग्टन सुंदरनं ३२ चेंडूत ५५ धावांचे योगदान दिले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६० चेंडूत १०४ धावांची भागीदारी रचली. अखेरच्या षटकात ग्लेन फिलिप्सनं ९ चेंडूत केलेल्या १४ धावांच्या जोरावर गुजरातने दिल्लीच्या मैदानातील लढाई २०० पार धावसंख्येची केली.
Web Summary : Gill, Buttler, and Washington's fifties propelled Gujarat Titans to 210/4 against Delhi Capitals. Their strong partnerships dominated the innings.
Web Summary : गिल, बटलर और वाशिंगटन के अर्धशतकों ने गुजरात टाइटन्स को दिल्ली कैपिटल्स के खिलाफ 210/4 तक पहुंचाया। उनकी मजबूत साझेदारियों ने पारी पर दबदबा बनाया।