कोरोना बसला दिल्ली कॅपिटल्सच्या मानगुटीवर, टीम सिफर्ट आला पॉझिटिव्ह

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिशेल मार्श कोरोनाबाधित झाल्याने सोमवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 09:37 IST2022-04-21T09:37:32+5:302022-04-21T09:37:56+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Delhi Capitals Team Seifert corona positive | कोरोना बसला दिल्ली कॅपिटल्सच्या मानगुटीवर, टीम सिफर्ट आला पॉझिटिव्ह

कोरोना बसला दिल्ली कॅपिटल्सच्या मानगुटीवर, टीम सिफर्ट आला पॉझिटिव्ह

मुंबई : पंजाब किंग्जविरुद्ध सामना सुरू व्हायच्या साडेतीन तास आधी बुधवारी दिल्ली कॅपिटल्सचा टिर्मी सिफर्ट हा कोरोनाबाधित आढळला.  बुधवारी सकाळी आरटीपीसीआर चाचणीत सिफर्ट पॉझिटिव्ह आढळला. यामुळे दिल्ली संघातील कोरोनाबाधितांची संख्या सहा झाली. 

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिशेल मार्श कोरोनाबाधित झाल्याने सोमवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीच्या एका खेळाडूने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘बुधवारी सकाळी आमची कोरोना चाचणी झाली होती. त्यानंतर दुसरी चाचणीही होणार होती. सध्या आम्ही सर्व सदस्य वेगवेगळे राहत आहोत.’ 

पुण्यातील आणखी एक सामना मुंबईत
ल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील ३४वा सामना २२ एप्रिल रोजी पुणे येथे होणार होता. मात्र कोरोना संक्रमणामुळे हा सामना २२ एप्रिललाच वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. 

या सदस्यांना झाली लागण
दिल्ली संघात आतापर्यंत सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सिफर्टसह पॅट्रिक फरहार्ट (फिजिओ), चेतन कुमार (मसाज थेरपिस्ट), मिशेल मार्श (अष्टपैलू), डॉ. अभिजित साळवी आणि आकाश माने (सोशल मीडिया टीम सदस्य) यांचा समावेश आहे.
 

Web Title: Delhi Capitals Team Seifert corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.