Join us

दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स संघही यूएईत दाखल

कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात मोठ्या टी-२० लीगचे १३ वे पर्व संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथील तीन स्थळ दुबई, अबूधाबी आणि शारजाह येथे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 01:35 IST

Open in App

दुबई : दिल्ली कॅपिटल्स व सनरायजर्स हैदराबादचे भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ चेहऱ्यावर मास्क व शिल्ड परिधान करीत आगामी इंडियन प्रीमियर लीगसाठी रविवारी दुबईत दाखल झाले.

कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात मोठ्या टी-२० लीगचे १३ वे पर्व संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथील तीन स्थळ दुबई, अबूधाबी आणि शारजाह येथे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे. हैदराबादचा संघ प्रथम दाखल झाला आणि त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ मुंबईहून येथे पोहोचला. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या मानक परिचालन प्रक्रियेंतर्गत खेळाडूंना अनिवार्य सहा दिवस विलगीकरणात राहावे लागेल. विलगीकरण कालावधीदरम्यान प्रत्येकाची आरटी-पीसीआर चाचणी पहिल्या, तिसºया व सहाव्या दिवशी करण्यात येईल. त्यानंतर निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच खेळाडूंना ‘बायो बबल’मध्ये प्रवेश मिळेल.

दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज मल्होत्रा, सहायक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रात म्हटले की, ‘आम्ही सर्व उत्सुक आहोत. संघातील खेळाडू पुन्हा एकत्र आले आहेत. हे आपल्या कुटुंबीयांसोबत भेटल्याप्रमाणे आहे.’ 

टॅग्स :आयपीएल