Join us  

Delhi Capitals New Jersey Look, IPL 2022: Rishabh Pant च्या 'दिल्ली कॅपिटल्स'चा नवा लूक; त्यांची नवीन जर्सी पाहिलीत का?

जर्सीच्या पुढील बाजूस वाघ गर्जना करत असल्याचा लोगो, एकदा जर्सी बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 12:52 PM

Open in App

Delhi Capitals New Jersey Look, Rishabh Pant : IPL 2022 चा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. त्याचा अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व १० फ्रँचायझींनी तयारी पूर्ण केली आहे. या नव्या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) चा संघ पूर्णपणे नवीन लूकमध्ये दिसणार आहे. दिल्ली संघाने नवीन हंगामासाठी आपली नवीन जर्सी लाँच केली आहे. दिल्लीच्या टीमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून नवीन जर्सी लॉन्च केली. जर्सीच्या पुढील बाजूस वाघाच्या गर्जनेचा लोगो लावण्यात आला आहे, तर मागच्या बाजूला पंजाच्या खुणा आहेत.

दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे आहे. तो प्रथमच आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. २०२० च्या मोसमात दिल्ली संघाने आतापर्यंत फक्त एकदाच अंतिम सामना खेळला होता, तेव्हा मुंबई इंडियन्सने त्यांचा पराभव केला होता. दिल्ली संघाने आतापर्यंत ६ वेळा प्ले-ऑफ्सचे सामने खेळले आहेत, मात्र त्यांना एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही.

संघाने मेगा लिलावात डेव्हिड वॉर्नरसारख्या खेळाडूला ६.२५ कोटींना विकत घेतले. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सला शार्दुल ठाकूरसाठी १०.७५ कोटी रुपये खर्च करावे लागले. दिल्लीने या पूर्वीच ऋषभ पंतवर १६ कोटी रुपये आणि अक्षर पटेलवर ९ कोटी रुपये तर पृथ्वी शॉ याच्यावर ७.५ कोटी रुपये खर्च केलेत.

टॅग्स :आयपीएल २०२२दिल्ली कॅपिटल्सरिषभ पंतडेव्हिड वॉर्नर
Open in App